pub-7425537887339079
ब्रेकिंग

गौराई समोरच्या देखाव्यांनी वेधले लक्ष : भाविकांनी मनोभावे घेतले दर्शन

0 5 2 0 2 1
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.21

टेंभुर्णी गौराई उत्सवाची सांगता शनिवारी झाली. गौरी विसर्जनाच्या दिवशी दिवसभर महिलांनी घरोघरी जाऊन गौरींचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी गौरी समोर साकारलेल्या वेगवेगळ्या देखाव्यांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. जाफराबाद तालुक्यातील अकोला देव येथील शेतकरी बद्रीप्रसाद शेळके यांच्या घरी दरवर्षी गौरी समोर वेगवेगळे देखावे साकारले जातात. त्यातून शैक्षणिक, सामाजिक व आध्यात्मिक संदेश देण्याचा प्रयत्न हे कुटुंबिय सातत्याने करीत आहे. यावर्षी त्यांनी आपल्या गौरी समोर तुळशीला पाणी घालणारी गौरी व महादेवाच्या पिंडीची मनोभावे पूजा करणारी गौरी असे देखावे साकारले होते. या देखाव्यात त्यांनी साकारलेला जिवंतपणा अनेकांच्या मनाला प्रफुल्लित करून गेला. गौरी समोर साकारलेल्या या देखाव्याचे परिसरात कौतुक होत आहे. हा देखावा बनविण्यासाठी स्वतः बद्रीप्रसाद शेळके यांच्यासह त्यांच्या पत्नी छाया शेळके, सून कांचन सौरभ शेळके व सासरहून खास गौरीसाठी माहेरी आलेली मुलगी पूजा किरण जाधव (रा.पैठण) यांनी पुढाकार घेतला. फोटो – अकोला देव येथील शेतकरी बद्रीप्रसाद शेळके यांनी आपल्या गौरी समोर असा मनमोहक देखावा साकारला होता. इन्सॅट मध्ये देखाव्यातील तुळशीला पाणी घालणारी व महादेवाची पूजा करणारी गौरी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 0 2 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे