जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत अदिती राय द्वितीय

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.11
हिंदू समाज संस्था संचलित कै.बाबुराव जाफराबादकर माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी अदिती नीरज राय हिने जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत खाजगी शाळांच्या गटातून द्वितीय क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
रोटरी क्लब, शिक्षण विभाग तसेच आयोजकांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत अदितीने प्रभावी वक्तृत्व व उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर द्वितीय क्रमांक मिळविला. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व सन्मान करण्यात आला.
यावेळी जालना पंचायत समितीचे समन्वयक सी. बी. जाधव यांच्यासह आयोजक विनोद राय कंपनीचे मालक सुनीलभाई रायठठा व अन्य मान्यवर उपस्थित होते.
अदितीला या स्पर्धेसाठी शिक्षक संदीप इंगोले यांचे मार्गदर्शन लाभले.
अदितीच्या या यशाबद्दल हिंदू समाज संस्थेचे अध्यक्ष अरुण किनगावकर, उपाध्यक्ष रावसाहेब अवघड, सचिव ॲड. संजय देशपांडे, संचालक ॲड. संजीव देशपांडे, नितीन कोळेश्वर, जुगलकिशोर भक्कड, जगदीश बडवे, चंद्रशेखर वाघमारे, दीपक तांबोळी, भगवान धोत्रे, संजय राठी, तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मीनाक्षी कुलकर्णी यांनी अभिनंदन केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीही अदितीचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



