pub-7425537887339079
ब्रेकिंग

श्रीमती जे.बी.के. विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा.

0 4 8 6 8 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.8

टेंभूर्णी शहरातील नामांकित नवभारत शिक्षण संस्था द्वारा संचालित श्रीमती.जे.बी. के.विद्यालय व नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयात भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधुन विद्यालयात स्वयंशासन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी नवभारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष जमिर शेख सर, संचालक प्रदिप मुळे यांनी विद्यालयातील सर्व शिक्षक, प्राध्यापक कर्मचारी वर्गास पुष्पगुच्छ व पेन भेट देऊन शुभेच्छा दिल्या.त्याच बरोबर नवभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष. संजय काबरा, सचिव. सत्यनारायण सोनी, कोषाध्यक्ष सुभाष राठी, जेष्ठ संचालक, माजी मुख्याध्यापक मधुकर निकम,विधिज्ञ प्रेमसुख काबरा, संचालक प्रदिप काबरा, संचालक विश्वनाथ सांगुळे, संचालक. दत्ताराव देशमुख, मनोहर घोडके यांनी शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या, तसेच विद्यालयात विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिना निमित्त उत्स्फूर्तपणे शिक्षकांच्या भूमिका पार पाडल्या इ. दहावी वर्गातील विद्यार्थी युवराज साळुंखे याने मुख्याध्यापक प्राचार्य म्हणून तर प्रतिक सरोदे, व आरती कबले यांनी उपप्राचार्य म्हणून,सोनल सपकाळ हिने पर्यवेक्षक म्हणून तर कोमल ससाणे हिने क्रिडाशिक्षक म्हणून उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली. अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत वर्गात शिकवण्याचा आनंद घेतला व शिक्षकांचे कार्य व भूमिका कशी असते हे समजून घेतले. स्वयंशासन दिन साजरा करण्यासाठी सांस्कृतिक मंडळाचे राजेंद्र जगताप, डॉ. आनंद जाधव, डॉ.अरुण आहेर, वासुदेव क्षिरसागर यांनी उत्कृष्ट नियोजन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.आनंद जाधव यांनी केले तर मुख्याध्यापक. संजय कुलकर्णी, सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख. एस. बी. बोरकर यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक. भिवसन ससाणे, रमेश इंगळे, विष्णू जाधव, क्रिडाप्रमुख कैलास भूतेकर, राजेश शेवाळे, रविंद्र मोरे, समाधान कांबळे, दत्ता ऊखर्डे, दिनकर ऊखर्डे, प्रा. सुनिल बनसोडे, प्रा. रामदास भांगे, प्रा.कैलास जाधव. प्रा. गजानन धोटे.उज्वला आवटी, एफ.ए.शेख, मंजुषा भिलावेकर,माधुरी पाटील, ज्योतीताई जाधव, निशिगंधा राजपुत,विजया शिल्लार सुनील सकुंडे, राजुभाऊ डोमळे, नागोराव देशमुख, दिपक देशमुख आदींनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 6 8 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे