शिरूर ताजबंद येथे ज्ञानेश्वरीच्या भक्तिरसात रंगला लातूर जिल्हा शाखेचा सांगता सोहळा.
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीने भव्य आयोजन; संत-महंत, पदाधिकारी व भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती

नांदेड/प्रतिनिधी, दि.30
अध्यात्म, भक्ती आणि संस्कारांची परंपरा पुढे नेण्याच्या उद्देशाने आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लातूर जिल्हा शाखेचा ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी शिरूर ताजबंद, ता. अहमदपूर येथील श्री बालाजी मंदिरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
हा सोहळा ह.भ.प. राम महाराज पांगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास दर्शनमूर्ती गुरुवर्य ह.भ.प. नामदेव महाराज दापकेकर तसेच आम्ही वारकरी परिवाराचे मुख्य मार्गदर्शक ह.भ.प. रावसाहेब पाटील शिराळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर ज्ञानेश्वरी साखळी पारायण व सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण भक्तिमय वातावरणात पार पडले. ज्ञानेश्वरीच्या ओव्यांच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पारायणानंतर विधिवत आरती करण्यात आली. आरतीचे यजमान शिरूर येथील श्री बालाजी मंदिर संस्थानचे अध्यक्ष मा. श्री. दत्ताभाऊ निवृत्तीराव जवळगे होते.
यानंतर लातूर जिल्हा शाखेच्या वतीने व्यासपीठावरील प्रमुख मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेल्या पत्रकार बांधवांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
ज्ञानेश्वरी पारायणाचे महत्त्व पटवून दिले
कार्यक्रमात उपस्थित संत-महंत व मान्यवरांनी मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली. यामध्ये ह.भ.प. राम महाराज पांगरेकर, ह.भ.प. पंढरीनाथ महाराज मिरकुटे, ह.भ.प. आकाश महाराज खोकले, ह.भ.प. नंदकिशोर महाराज पांचाळ तसेच श्री पद्माकर पेंढारकर यांचा समावेश होता.
मनोगतात संतांनी ज्ञानेश्वरीचे पारायण का करावे, संत ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला आध्यात्मिक संदेश, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात अध्यात्माची गरज याविषयी सखोल मार्गदर्शन केले. ज्ञानेश्वरी हा केवळ ग्रंथ नसून जीवन जगण्याची दिशा देणारा आध्यात्मिक मार्गदर्शक आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण
या सोहळ्यादरम्यान आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. वारकरी विचार, संतपरंपरा आणि सामाजिक सेवा अधिक व्यापक पातळीवर पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन लातूर जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. नंदकिशोर महाराज पांचाळ आणि लातूर जिल्हा संपर्कप्रमुख गोविंद माऊली इबितदार यांच्या पुढाकारातून करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शिवाजीराव पांगरेकर यांनी केले, तर गोविंद माऊली इबितदार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
महाप्रसादाने सोहळ्याची सांगता
कार्यक्रमाच्या शेवटी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील तसेच विविध ठिकाणांहून आलेल्या भाविकांनी मोठ्या श्रद्धेने व आनंदाने महाप्रसादाचा लाभ घेतला. भक्ती, ज्ञान, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.
मान्यवरांची विशेष उपस्थिती
या सोहळ्यास गुरुवर्य ह.भ.प. नामदेव महाराज दापकेकर, ह.भ.प. रावसाहेब पाटील शिराळे, ह.भ.प. राम महाराज पांगरेकर, ह.भ.प. हरिनाम पाटील कदम, शिवाजीराव पांगरेकर, चंपतराव महाराज डाकोरे,ह.भ.प. पंढरीनाथ महाराज मिरकुटे, ह.भ.प. आकाश महाराज खोकले,
उत्तमराव महाराज टाक, बालाजी महाराज पार्डीकर,. शेलारकर महाराज, बालाजीराव जामकर, दीपमालाताई तुपकर, दत्ता जाधव, नंदकिशोर महाराज पांचाळ, दगडू आप्पा कोरे, राजूभाऊ जाधव, श्रीमती कांताताई द्युत, प्रा. डी. एस. कोरे, सौ. उर्मिलाताई पांचाळ, सौ. गोविंद माऊली इबितदार, बालाजी पांचाळ, आनंदराव बरबडे, बळीराम दादा, मारोतराव वाघमोडे, नरसिंग मंतलवाड, श्रीराम पांचाळ, हनुमंत जाधव, अनिल महाराज मगर, पद्माकर पेंढारकर, बलशेटवार प्रल्हाद आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
तसेच पत्रकार धम्मपाल सरोदे, दिलीपराव मोरे, मच्छिंद्रनाथ पांचाळ, मनोहर यरपुरवाड, बापूराव श्रीमंगले आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
ज्ञानेश्वरी सांगता सोहळा अतिशय उत्साहात आणि आनंदामध्ये व उत्कृष्ट नियोजनामध्ये पार पाडला.
अशी माहिती आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य. लातुर जिल्हा संपर्क प्रमुख गोविंद महाराज इबितदार गडकरी यांनी दिली
असे प्रसिध्दी पत्रक आम्ही वारकरी परिवार महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी पत्रकात चंपतराव डाकोरे पाटील यांनी दिली




