pub-7425537887339079
ब्रेकिंग

एनसीएमसी कार्ड असूनही प्रवाशांचा गोंधळ!

कार्डमध्ये शिल्लक रक्कम नसल्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना बसतोय पूर्ण तिकिटाचा भुर्दंड

0 4 8 6 8 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.8

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी ‘एनसीएमसी’ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) अनिवार्य केले आहे. मात्र, या कार्डबाबत पुरेशी माहिती आणि जनजागृती नसल्याने प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला असून, सवलतीच्या प्रवासाला ‘कार्ड’चा अडसर ठरत आहे.
माहितीच्या अभावामुळे प्रवाशांची तारांबळ
अनेक प्रवाशांना केवळ एनसीएमसी कार्ड दाखवून सवलतीचा प्रवास करता येईल असा समज होता. मात्र, सवलतीचे तिकीट काढण्यासाठी कार्डमध्ये पुरेशी रक्कम (बॅलन्स) असणे आवश्यक आहे. ही माहिती नसल्याने बसमध्ये चढल्यानंतर ऐनवेळी प्रवाशांना कार्डमध्ये रक्कम नसल्याचे समजते. त्यामुळे त्यांना सवलत न मिळता पूर्ण तिकिटाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
सर्व्हर डाऊनची मुख्य समस्या
ऐनवेळी कार्ड रिचार्ज करण्याचा प्रयत्न केल्यास एसटी वाहकांच्या उपकरणांमध्ये ‘सर्व्हर डाऊन’ची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे प्रवाशांचे कार्ड रिचार्ज होऊ शकत नाही. परिणामी, वाहक आणि प्रवाशांमध्ये वादाच्या घटना घडत असून प्रवाशांची मोठी धावपळ होत आहे.
अतिरिक्त कपातीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी
सवलतीचे कार्ड असूनही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना रोख पैसे देऊन पूर्ण तिकिटाचा प्रवास करावा लागत आहे. तसेच, रु. १०० चे रिचार्ज करताना कर स्वरूपात extra १ रुपया कापला जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे. कार्ड काढण्यासाठी २५० रुपये खर्च करावे लागल्याने आणि त्यानंतरही प्रवासात अडचणी येत असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आगारप्रमुखांचे स्पष्टीकरण
“महिलांनी ५० टक्के प्रवास सवलतीचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड सोबत बाळगावे. प्रत्येक वाहकाकडे आणि तालुक्यातील बसस्थानकांसह विविध केंद्रांवर कार्ड रिचार्जची सुविधा उपलब्ध आहे. प्रवाशांनी कार्डमध्ये पुरेशी रक्कम ठेवून सहकार्य करावे.”
— योगेश गिते, आगारप्रमुख, जाफराबाद

प्रवाशांना योग्य माहिती पुरवून सर्व्हरची समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिक आणि महिला प्रवाशांकडून केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 6 8 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे