pub-7425537887339079
ब्रेकिंग

उरणमध्ये मुसळधार पाऊस; पूरपरिस्थितीत नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर स्वतः रस्त्यावर, नागरिकांना दिली मोठी मदत!

0 4 7 9 9 6
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.4

उरण तालुक्यात, शहरात सतत जोरदार पाऊस सुरु असून उरण शहरात आज झालेल्या प्रचंड मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा कठीण प्रसंगी उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांनी स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा न करता थेट मैदानात उतरून मदतकार्य सुरू केले आहे. सत्र न्यायालय (सेशन कोर्ट) परिसर आणि उरणमधील इतर गंभीर पूरग्रस्त भागांमध्ये भावनाताई घाणेकर यांनी स्वतः पाण्यात उतरून परिस्थितीची पाहणी केली. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवणे आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला गती देणे, यासाठी त्या स्वतः जागोजागी धावपळ करताना दिसत आहेत. नगराध्यक्षांच्या या धाडसी भूमिकेमुळे ‘प्रशासकीय यंत्रणा संपूर्ण ताकदीने नागरिकांच्या पाठीशी उभी असून, कोणीही घाबरून जाऊ नये,’ असे आवाहन यावेळी नगराध्यक्षांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 9 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे