उरण तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेला पिरवाडी किनारा पुन्हा एकदा एका थरारक घटनेमुळे चर्चेत आला आहे. सोमवारी संध्याकाळी समुद्रात फिरायला गेलेले पाच पर्यटक भरतीमुळे खडकांमध्ये अडकले होते. मात्र, सागर सुरक्षा रक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या पाचही जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
सोमवारी संध्याकाळी काही पर्यटक उत्साहाच्या भरात किनाऱ्यापासून लांब असलेल्या खडकांवर गेले होते. यावेळी समुद्राला भरती आल्याने पाण्याचा वेढा वाढला आणि हे पर्यटक मध्येच अडकून पडले. जीवाची भीती निर्माण झाल्याने पर्यटकांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. यावेळी तिथे तैनात असलेल्या सागर सुरक्षा रक्षकांनी कोणतीही वेळ न घालवता तातडीने धाव घेतली आणि पाचही पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
पिरवाडी किनाऱ्यावर वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी असते. येथे खाण्यापिण्याची आणि मनोरंजनाची उत्तम सोय असली, तरी प्रशासकीय उदासीनता स्पष्टपणे दिसून येत आहे. किनाऱ्यावर कुठेही धोक्याच्या सूचना देणारे फलक नसल्याने नवीन येणाऱ्या पर्यटकांना पाण्याचा आणि खडकांचा अंदाज येत नाही. अनेकदा उत्साहाच्या भरात पर्यटक खोल पाण्यात किंवा खडकांवर जातात आणि आपला जीव धोक्यात घालतात.
पिरवाडी किनाऱ्यावर पर्यटकांना योग्य दिशा मिळावी आणि असे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठिकठिकाणी माहिती फलक आणि इशारा देणारे बोर्ड लावावेत, अशी मागणी स्थानिक आणि पर्यटकांकडून केली जात आहे. सोमवारी झालेल्या या घटनेत केवळ सुरक्षा रक्षकांच्या तत्परतेमुळे सर्वांचे प्राण वाचले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
त्रिमूर्ती इंग्लिश स्कूल मोहपुरीच्या दिंडी सोहळ्याने दुमदुमली बोधलापुरी नगरी आषाढी एकादशी निमित्त ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाने भक्तीरस, सामाजिक संदेशाचा अनुपम सोहळा
9 hours ago
साई ट्रस्ट विद्यालयात रंगला भक्तीचा मळा
9 hours ago
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बदनापूर विधानसभा मतदारसंघात रुग्णांना फळवाटप
9 hours ago
जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
9 hours ago
रायगड येथे निवासी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या पोलीस पाटील व कोतवालांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आपदा मित्र किट व प्रमाणपत्रांचे वितरण
2 days ago
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 : जालना जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध; आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू
2 days ago
आई एकवीरा मातेच्या जयघोषात ९ ऑगस्ट रोजी ‘भव्य बाईक रॅली’; कोप्रोली ते श्री क्षेत्र कार्ला एकवीरा गडावर भक्तिमय प्रवास.
2 days ago
माझ्या पंढरीची वारी जगात भारी : महेंद्रशेठ घरत स्वयंसेवक आणि पोलिस प्रशासनाला सॅल्युट.
2 days ago
स्वर्गीय अश्विन पाटील मित्र परिवार तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन; नागरिकांना रक्तदानाचे आवाहन.