pub-7425537887339079
ब्रेकिंग

जाफराबाद–जळगाव बससेवा तातडीने सुरू करण्याची व्यापारी व नागरिकांची मागणी

0 4 7 1 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.19

जाफराबाद ते जळगाव ही एसटी बससेवा पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी जाफराबाद शहरातील व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे. सध्या या मार्गावर थेट एसटी बससेवा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून, त्यामुळे आर्थिक भुर्दंड तसेच वेळेचा अपव्यय होत आहे. जळगाव येथे शिक्षण, नोकरी, शासकीय कामे, व्यवसाय आणि वैद्यकीय उपचारांसाठी दररोज मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, जाफराबाद–जळगाव बससेवा सुरू झाल्यास प्रवाशांची मोठी सोय होईल. तसेच जाफराबाद आगाराच्या उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होईल. त्यामुळे ही बससेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घेऊन जाफराबाद–जळगाव बससेवा तातडीने सुरू करावी, अशी अपेक्षा व्यापारी व नागरिकांनी व्यक्त केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 1 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे