भारतीय जनता पार्टीच्या वतीने घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांसाठी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय निवासी प्रशिक्षण महाअभियान-२०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. हे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर शनिवार, २८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता संजीवन ध्यान समाधान केंद्र, मच्छिंद्रनाथ चिंचोली (ता. घनसावंगी) येथे सुरू होणार आहे. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे व प्रदेश सचिव रेखा कुलकर्णी यांच्या यांच्या हस्ते संपन्न होईल. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार नारायणराव कुचे, माजी आमदार विलासबापू खरात यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती घनसावंगी विधानसभेचे निवडणूक प्रमुख सतीश घाटगे यांनी दिली.
घनसावंगी विधानसभेतील रांजणी, शहागड आणि घनसावंगी अशा तिन्ही मंडळातील कार्यकर्त्यांसाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या निवासी शिबिरात पक्षाचा इतिहास, सरकारची कामगिरी, बूथ व्यवस्थापन, संघटन विस्तार तसेच सोशल मिडिया व एआय या विषयांवर विविध तज्ज्ञ वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये दीपक भैया ठाकूर, डॉ. राजू निवृत्ती साळवे, राजेश मोरे आणि गोविंद ढेंबरे यांचा समावेश आहे. रविवार २९ मार्च रोजी सकाळी ११:०० वाजता माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थिती या शिबिराचा समारोप होणार आहे. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात वैचारिक अधिष्ठान आणि सोशल मीडिया, एआय (AI) व नमो ॲप या तांत्रिक विषयांवर सुरेश केसापुरकर आणि विकास कदम हे मार्गदर्शन करतील.
पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांची शिदोरी प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले असून, या शिबिरात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सतीश घाटगे पाटील यांनी केले आहे.
एमबीबीएस पदवी पूर्ण केल्याबद्दल डॉ. साळवे, डॉ. मोठे यांचा मानव सेवा मंडळातर्फे सत्कार
8 hours ago
‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन 29 जुलै रोजी जालन्यात विविध सांस्कृतिक, साहित्यिक व सर्जनशील स्पर्धा; युवकांना सहभागाचे आवाहन
8 hours ago
शालेय बस-व्हॅनसाठी नवे नियम लागू; सुरक्षा उपाय अनिवार्य 23 ते 30 जुलैदरम्यान विशेष तपासणी मोहीम; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई
8 hours ago
लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला 13 ऑगस्टपासून होणार सुरुवात आयव्हीबीपी संस्थेकडून 1 कोटी लसींचे वितरण
8 hours ago
सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व विद्यार्थी जीवनातच घडते- प्राचार्य डॉ ठक्कर.
8 hours ago
मोरा सागरी पोलीस ठाणे, नवी मुंबई हद्दीत आढळला अनोळखी बेवारस इसमांचे मृतदेह.
8 hours ago
खोपटे येथे मत्स्य शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आणि मत्स्य बीज वाटप कार्यक्रम संपन्न.
8 hours ago
जंतर मंतर दिल्ली येथिल विद्यार्थ्यावरील अमानुष लाठीमार विरोधात उरण मधे निदर्शने.
8 hours ago
श्री साई सेवा मंडळ उरण विभाग तर्फे वृक्षारोपण
8 hours ago
जाफ्राबाद शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी महेबुब खान पठाण