pub-7425537887339079
ब्रेकिंग

अध्यक्षपदी नरसू पाटील यांची बिनविरोध निवड

0 4 6 9 1 1
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.19

उच्च न्यायालयाच्या व धर्मादाय आयुक्त यांचे निरीक्षक सत्यनारायण शेनॉय यांच्या निरीक्षणाखाली दिशा शिक्षण व विकास केंद्र गडहिंग्लज ची त्रैवार्षिक निवडणूक दिनांक १७ जुलै २०२६ रोजी अतिशय आनंदाने आणि उत्साहाने पार पडली. यावेळी संस्थेच्या उपस्थित सभासदांनी बंद पडलेले ई. बी. गडकरी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व नवीन निर्माण केलेल्या नरसू पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी यांची ज्याने खऱ्या अर्थाने सुरुवात केली व दोन्ही कॉलेजची नावे महाराष्ट्राच्या क्षितिजावर झळकवली अशा विद्यमान अध्यक्ष नरसू पाटील यांची सर्व सभासदांनी निरीक्षकांच्या निरीक्षणाखाली बिनविरोध निवड केली. यावेळी विद्यमान सचिव ब्रह्मानंद नरसू पाटील यांचीही सचिव पदी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली तसेच संस्थेच्या उपाध्यक्षपदी संतु दत्तू पाटील व खजिनदार पदी तरुण तडफदार शुभम संतू पाटील यांची ही निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी जमाखर्च व पुढील अंदाजपत्र मांडण्यात आले. याचबरोबर आपल्या हॉस्पिटल व कॉलेज च्या उन्नतीसाठी नवीन उपक्रम कसे राबवता येतील हे मांडण्यात आले.हे सर्व प्रस्ताव सर्व सभासदांनी एकमुखी मंजूर केले यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष नरसू पाटील यांनी मरीन इंजिनिअरिंग कॉलेज व बी एच एम एस कॉलेजच्या १०० इंटेक साठी तसेच पॅरामेडिकल कॉलेजच्या उभारणीसाठी संस्थेच्या सर्व सभासदांच्या सहकार्याने उभे करण्याचे सुतोवाच केले. ते पुढे म्हणाले या कॅम्पसचे अल्पावधीतच नंदनवन करू व समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देण्याचे आपल्या भाषणात अभिवचन देण्यात आले.यावेळी निरीक्षक सत्यनारायण शेनॉय यांच्या उपस्थितीत अतिशय आनंदाने उत्साहाने सभा संपन्न झाली. या सभेनंतर अध्यक्ष नरसु पाटील यांचा आर के म्हात्रे सचिव ब्रह्मानंद पाटील आणि उपाध्यक्ष संतू दत्तू पाटील यांचा हायकोर्ट चे प्रसिद्ध वकील प्रशांत भावके तसेच खजिनदार शुभम पाटील यांचा नारायण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी अप्पा शिवणे यांचाही संस्थेच्या भरीव योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.यानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने प्राचार्य डॉ. जे आर फगरे यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांचे येतोचित सत्कार करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. जे आर फगरे म्हणाले नरसु पाटील यांच्या रूपाने आम्हा संस्थेला कॉलेजला नवा चेहरा मिळालेला आहे आम्ही गेल्या तीन वर्षात ९९ टक्के निकाल केवळ नरसु पाटील यांच्या नेतृत्वाखालीच लावू शकलो यापुढे महाराष्ट्रात ही दोन्ही कॉलेज प्रथम क्रमांकावर आणू यासाठी आम्ही सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी कटिबद्ध आहोत आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे संस्था दिशा शिक्षण व विकास केंद्र अध्यक्ष नरसु पाटील यांच्या नेतृत्वाखाली भरभराटिस येईल असा आम्हास विश्वास वाटतो.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 9 1 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे