pub-7425537887339079
ब्रेकिंग

उरणमध्ये एकाच दिवशी दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह; नागरिकांमध्ये खळबळ

0 4 5 5 2 7
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.29

उरण तालुक्यात शनिवारी (२८ जून २०२६) अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पहिली घटना दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास उरण रेल्वे स्थानकाबाहेर उरण–पनवेल मार्गालगत साचलेल्या पाण्यात घडली. स्थानिक नागरिकाला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह दिसून आल्यानंतर त्यांनी तात्काळ उरण पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर उरण पोलीस व सिडको अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पुढील तपासासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. मृत व्यक्तीने टी-शर्ट आणि निळ्या रंगाची पँट परिधान केली होती. यानंतर अवघ्या तासाभरात, दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास, न्हावा शेवा पोलीस ठाण्याजवळील JW कंपनीच्या कंपाउंडबाहेरील नाल्यात आणखी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच न्हावा शेवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पुढील तपासासाठी पाठविण्यात आला. एकाच दिवशी उरण तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीती आणि खळबळ निर्माण झाली आहे. दोन्ही मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून, कोणाची व्यक्ती बेपत्ता असल्यास त्यांनी तात्काळ उरण पोलीस ठाणे आणि न्हावा शेवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 5 2 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे