pub-7425537887339079
ब्रेकिंग

युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडियाची बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना सदिच्छा भेट; विविध सामाजिक विषयांवर सकारात्मक चर्चा

0 4 5 5 2 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.2

युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडिया यांच्या वतीने आज बुलढाणा जिल्हाधिकारी Dr. Pravinkumar Deore यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, प्राणी संरक्षण व बचावकार्य, युवकांचा सामाजिक सहभाग, जनजागृती उपक्रम, आपत्ती व्यवस्थापन तसेच शासन व सामाजिक संस्थांच्या समन्वयातून लोकहिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत विचारांची देवाणघेवाण झाली. युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडियामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी समन्वयाने कार्य करणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. सामाजिक क्षेत्रात लोकसहभाग वाढवून पर्यावरण संरक्षण, प्राणी कल्याण आणि समाजोपयोगी उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली. यावेळी युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडियाचे दुर्गेश बनकर, वैभव लाखोले, उमेश गिराम आणि ज्ञानेश्वर शास्त्री उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 5 2 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे