pub-7425537887339079
ब्रेकिंग

कष्टाचे चीज, संघर्षाचा अंत ! प्रतिकूलतेची भिंत फोडून टेंभुर्णीत उभी राहिली ‘गुरुकुल विद्या मंदिर

सातभाई सरांचा जिद्दी इतिहास

0 4 7 9 9 4
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.14

सिंहाची चाल आणि संघर्षाची ढाल असणाऱ्याच्या वाटेत कितीही काटे आले, तरी तो स्वतः चा मार्ग स्वतःच बनवतो ! हे विधान शब्दशः खरे करून दाखवले आहे टेंभुर्णीचे सुपुत्र सातभाई सर यांनी ! अथांग दारिद्र्य, अस्मानी अन् सुलतानी संकटांचा सामना करत, समाजातील टोमणे आणि अडथळ्यांची तमा न बाळगता सातभाई सरांनी संघर्षाचा गडद अंधार भेदून यशाचा लखलखता सूर्य उगवला आहे. त्यांनी उभी केलेली ‘गुरुकुल विद्या मंदिर’ ही केवळ एक वास्तू नसून, तो अन्यायावर, संघर्षावर आणि गरिबीवर मिळवलेल्या विजयाचा जिवंत पुरावा आहे !

एका सामान्य कुटुंबातून आलेल्या सातभाई सरांचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. ज्या वेळी लोकांनी त्यांच्या क्षमतेवर शंका उपस्थित केली, ज्या वेळी पाऊलोपाऊली अडचणींचे डोंगर उभे राहिले, त्या वेळी खचून न जाता त्यांनी जिद्दीचा अंगार उराशी बाळगला. अहोरात्र घेतलेले कष्ट, उपाशीपोटी काढलेले दिवस आणि ध्येयाने पेटलेले मन याच्या जोरावर त्यांनी परिस्थितीचे चित्रच पालटून टाकले.

‘गुरुकुल विद्या मंदिर’ – केवळ शाळा नाही, तर क्रांती ! सातभाई सरांनी स्थापन केलेली ‘गुरुकुल विद्या मंदिर’ ही शाळा म्हणजे केवळ विटा सिमेंटची इमारत नाही, तर ती हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणारी ज्ञानक्रांती आहे. प्रतिकूलतेतही गुणवत्तेशी तडजोड न करता त्यांनी उभारलेले हे शैक्षणिक साम्राज्य आज शिक्षण क्षेत्रातील विरोधकांचे डोळे उघडणारे ठरले आहे. ‘शिक्षणाचा बाजार’ मांडणाऱ्यांच्या तोंडावर चपराक मारत, अत्यंत शिस्तबद्ध आणि दर्जेदार शिक्षण देऊन त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा दणदणीत ठसा उमटवला आहे.

गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा !

सातभाई सरांच्या या देदीप्यमान यशाने केवळ त्यांच्याच स्वप्नांची पूर्ती झालेली नाही, तर संपूर्ण टेंभुर्णी गावाचा स्वाभिमान आणि मान उंचावला आहे! आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांच्या या कौतुकास्पद यशाचीच चर्चा रंगली असून, विरोधक आणि टीकाकार हादरून गेले आहेत.

अडचणी अनेक आल्या, पण ध्येय स्पष्ट होते, असा संदेश आपल्या कृतीतून देणाऱ्या सातभाई सरांचा हा प्रवास आजच्या तरुण पिढीसाठी धगधगती प्रेरणा ठरत आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या सातभाई सरांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल टेंभुर्णी व परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे !

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 9 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे