pub-7425537887339079
ब्रेकिंग

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त ‘शिक्षक मित्र वक्तृत्व स्पर्धा’

0 4 9 7 4 5
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.22

जालना : महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त १०० शिक्षक समुह जालना यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षक मित्र वक्तृत्व स्पर्धा – २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन, चिंतन, वक्तृत्व कौशल्य आणि सामाजिक जाणीव विकसित करण्यासोबतच महात्मा फुले यांच्या विचारांचा परिचय करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा इयत्ता ५ वी ते ७ वी (प्राथमिक) आणि इयत्ता ८ वी ते १० वी (माध्यमिक) अशा दोन गटांत होणार आहे. प्राथमिक गटासाठी ‘माणुसकी म्हणजे नक्की काय!’ आणि ‘मी वाचलेल्या पुस्तकातील महात्मा फुलेंचे विचार’, तर माध्यमिक गटासाठी ‘महात्मा फुलेंचे विचार – दुष्काळावर मात करण्याचा मार्ग दाखवतील का?’ आणि ‘ए आय साक्षरता – रोजगार निर्मितीचा पाया!’ हे विषय निश्चित करण्यात आले आहेत.
प्रत्येक शाळेतून प्रत्येक गटासाठी व प्रत्येक विषयासाठी एकच विद्यार्थी सहभागी होऊ शकणार असून, प्रत्येक गटात जास्तीत जास्त ३५ स्पर्धकांना संधी दिली जाणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला ५ मिनिटांचा वेळ देण्यात येईल. विषयाला योग्य न्याय मिळावा यासाठी लवकर नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवडीचा विषय मिळण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व महात्मा फुले लिखित पुस्तक देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ₹११००, ₹७०० व ₹५०० अशी पारितोषिके असून, उत्तेजनार्थ पारितोषिकाचीही तरतूद आहे. प्राथमिक गटातील पारितोषिकांसाठी जालना हॉस्पिटलचे डॉ. प्रदीप हुशे, उपशिक्षणाधिकारी श्री. गिरीश पुजारी व शिक्षणतज्ज्ञ श्री. ज्ञानेश्वर प्रकाश पवार, तर माध्यमिक गटासाठी शिक्षिका श्रीम. अनुजा बाळासाहेब खरात, उपशिक्षणाधिकारी श्री. सुभाष भालेराव व जेष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रमोद कुमावत यांचे सहकार्य लाभले आहे. उत्तेजनार्थ पारितोषिक शिक्षक श्री. मोहन देविदास अंभोरे व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र श्री.लक्ष्मण घनवट, अध्यक्ष – क्रांतीसुर्य महात्मा फुले प्रतिष्ठाण चंदनझिरा,जालना यांच्या सहकार्याने देण्यात येणार आहे.
नाव नोंदणीची अंतिम तारीख २६ सप्टेंबर २०२६ असून, नोंदणी केवळ व्हाट्सअप संदेशाद्वारे स्वीकारली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, वर्ग, शाळेचे नाव आणि निवडलेला विषय ही माहिती राजेभाऊ मगर – ८९७५२५८१२३, अशोक माधवले – ८२७५३३३१९३ किंवा संदीप इंगोले – ८६००६६५१०० यांच्याकडे पाठवावी. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धेचे ठिकाण, दिनांक व वेळ स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
विद्यार्थ्यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजेभाऊ मगर,आर .आर. जोशी, दत्तात्रय राऊतवाड, संदीप इंगोले,अशोक माधवले व साजिद खान पठाण, विजय निकाळजे, लक्ष्मण घनवट व सर्व पदाधिकारी १०० शिक्षक समुह जालना यांनी केले आहे.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 7 4 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे