pub-7425537887339079
ब्रेकिंग

एक गाव एक गणपतीची ५२ वर्षांची रिटघर गावची परंपरा. रिटघर गावचा आदर्शवत गणेशोत्सव.

पनवेल तालुक्यातील.. आदर्शवत असं रिटघर गाव 

0 4 9 7 4 5
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.19
असं म्हणतात की गाव करेल ते राव काय करेल !  ह्याच उक्ती प्रमाणे रिटघर गावाने गेल्या ५१ वर्षां पासून  समाजात एक वेगळाच असा आदर्श घालून दिला आहे १९७४ सालापासून सुरु केलेली” एक गाव एक गणपती “ही परंपरा आजही अखंडितपणे सुरू असून  या वर्षीचं  गणेशोत्सवाचं ५२ वे वर्ष हे अमृत महोत्सवी वर्षां कडून हीरक महोत्सवी वर्षांकडे वाटचाल करणारं वर्ष ठरणारं आहे.
      सुमारे २१०० लोकसंख्या असलेलं आणि ४०० उंबरठे असलेलं रिटघर गाव हे ” एक गाव एक गणपती ” ह्या आपल्या आगळ्या वेगळ्या अश्या परंपरेमुळे संपूर्ण पंचक्रोशीत नावारूपास आले आहे. येथे प्रत्येक घरां-घरांत वेगवेगळा गणपती बाप्पा न बसवता सन २०२४ चा  सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ म्हणुन विघ्नहर्ता पुरस्कार २०२४ या पुरस्काराने सन्मानित असणारं  जय हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ रिटघर या मंडळाच्या माध्यमातून सर्व गावकरी एकाच ठिकाणी एकत्र येऊन गावातील हनुमान मंदिरात गणेशाची स्थापना करतात.त्यामुळे गावातील एकोपा,स्नेह आणि बंधूभाव अधिक दृढ होत असतो आणि  सोबतच ह्या उपक्रमाद्वारे प्रत्येकाच्या घरां – घरांत खर्च न होता सार्वत्रिकपणे काहीसा खर्चाला आळा देखील बसतो आणि ह्याच एकोप्याच्या संकल्पनेमुळे सार्वजनिक पातळीवर गणेशोत्सव,गौरीउत्सव,नवरात्रोत्सव,गोपाळकाला या सारखे सर्व सण देखील सर्व गावकरी एकत्र येऊन एकत्रितपणे आनंदात साजरे केले जातात.
  रिटघर गावातील त्या काळच्या काही जुन्या जाणकार लोकांच्या संकल्पनेतून आणि लोकसहभागातून गावातील हनुमान मंदिरात सुरू झालेल्या ह्या उत्सवा करिता गावातील सर्व मंडळी आपले राजकीय,पक्षीय हेवेदावे बाजूला ठेऊन गावातील सर्व लोकं एकत्र येऊन एकोप्याचं दर्शन घडवत ” एक गाव एक गणपती ” हा  उत्सव अगदी दिमाखदार स्वरुपात साजरा करतानां दिसतात त्यामुळेच खर्‍या अर्थाने ह्या उत्सवाला आत्ता मोठं स्वरूप प्राप्त झालं आहे.गावातील तरुण मंडळी गणेशोत्सवात सजावट आणि आरास स्वतः तयार करतात आणि विशेष म्हणजे ही आरास संपूर्णपणे इकोफ्रेंडली असते पर्यावरण पूरक आरास आणि सजावट व चलचित्रांचे देखावे हा रिटघर गावच्या उत्सवाचा महत्वाचा भाग आहे आणि म्हणुनच पारंपरिक कलांचे जतन करून आधुनिकतेशी सुसंवाद साधनारी ही आरास आणि चलचित्रांचे देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेत असतात.
   गणेश उत्सवाच्या काळात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक,कला,क्रिडा,व्यवसाय अश्या विविध क्षेत्रातील तसेच पोलीस खात्यातील मान्यवर मंडळी उत्सवाला आवर्जून भेट देत असतात तर गणेशोत्सवाच्या काळात रिटघर गावात भजन, कीर्तन, काकडा, हरिपाठ, पारायण तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम व खेळांचे आयोजन करून खर्‍या अर्थाने गावात आध्यात्मिकते सोबतच संस्कृतीची देखील जपणूक करून समाजात एक आदर्श निर्माण केला जातोय.
    गणेशोत्सव हा आज अनेक ठिकाणी आवाजावी खर्च, स्पर्धा आणि दिखाऊपणामुळे मूळ उद्देशा पासून दूर होत चालला आहे मात्र रिटघर गावाने जय हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळच्या  माध्यमातून ” एक गाव एक गणपती ” च्या संकल्पनेतून खर्चाला फाटा देत सामाजिक ऐक्याची आणि पर्यावरणपूरकतेची प्रेरणादायी परंपरा जोपासली आहे.
    गावातील आबालवृद्ध, महीलांभगिनी आणि तरूण मंडळीच्या सहभागातून ” एक गाव एक गणपती ” ही  ५२ वर्षाची अखंडपणे चाललेली परंपरा केवळ रिटघर गावापूरती मर्यादित न राहता समाजासाठी अनुकरणीय ठरणारी ही परंपरा ईतर गावांसाठी देखील आदर्शवत ठरणारी अशीच आहे.अशी माहिती माजी सरपंच भारत भोपी यांनी दिली.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 7 4 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे