पत्रकार – पोलीस समन्वय अधिक दृढ करण्याचा निर्धार; जाफ्राबाद येथे पोलीस अधीक्षक तेजबीर सिंग सिंधू यांचा सत्कार

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.4
मराठी पत्रकार संघ, जाफ्राबाद यांच्या वतीने दि. २ जून रोजी जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेजबीर सिंग सिंधू यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार व पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन काटेकर, पोलीस निरीक्षक सतीश जाधव, ज्येष्ठ पत्रकार मोहन मुळे, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष मुकेश भरद्वाज, पत्रकार सलमान पठाण, चेतन बयास, मंगल भरद्वाज, शेख अय्युब, शेख कदीर, प्रल्हाद लोणीकर, रेस्पॉन्सिअल ऑफ महाराष्ट्राचे शेख आशपाक, तसेच इतर पत्रकार उपस्थित होते. सत्कारानंतर झालेल्या चर्चे दरम्यान जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच पत्रकार आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय करण्यात आला. सम ाजहितासाठी पत्रकार आणि पोलीस यांच्यातील परस्पर सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी पत्रकारांनी स्थानिक पातळीवरील विविध प्रश्न उपस्थित केले. त्यावर पोलीस अधीक्षक तेजबीर सिंग सिंधू यांनी पत्रकारांनी प्रशासनाला दिलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यातही हा समन्वय कायम ठेवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात पत्रकार आणि पोलीस प्रशासन यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
