pub-7425537887339079
ब्रेकिंग

महानगरपालिकेसमोरच मृत्यूचा सापळा, महावितरणचा हलगर्जीपणा – सभापती संध्या देठे यांचा उपोषणाचा इशारा

0 4 9 7 4 4
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.29

जालना शहर महानगरपालिका कार्यालयासमोर, प्रभाग क्र. 9 मधील स्वामी विवेकानंद चौक ते महात्मा गांधी रोडवर रस्त्याच्या मधोमध असलेला जुना व धोकादायक विद्युत पोल गेल्या दीड वर्षापासून मृत्यूचा सापळा बनला आहे.

सभापती सौ. संध्या संजय देठे यांनी व जालना शहर महानगरपालिका विद्युत विभाग अभियंता कोमल गावंडे यांनी वेळोवेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता, MSEDCL यांना 4 वेळा पत्र देऊन (05/08/2025, 25/09/2025, 08/06/2026, 08/07/2026) पोल शिफ्टिंगची सुधारित अंदाजपत्रक याची परवानगी मागणी केली, मात्र महावितरणने कुठलीच दखल घेतली नाही. या पोलमुळे अनेक अपघात होऊन नागरिक जखमी झाले आहेत. व मृत्युमुखी पडले आहेत

या हलगर्जीपणाचा निषेध करत सभापती देठे यांनी इशारा दिला आहे की, 7 दिवसात पोल स्थलांतरित न केल्यास त्या थेट महावितरण कार्यालयात उपोषणाला बसणार आहेत.

——————————————————————-
महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे जर एखाद्या नागरिकाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण? महानगरपालिकेसमोरचाच पोल दीड वर्ष हलवता येत नाही, तर सर्वसामान्य जनतेचे काय असा प्रश्न निर्माण होत आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 7 4 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे