कार आणि ट्रकच्या अपघातामध्ये, टेंभुर्णी येथून जवळच असलेल्या कुंभारझरी येथील दोघा मित्रांचा मृत्यू, देवदर्शनासाठी निघाले होते

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.29
अपघातात दोन मित्र ठार झाल्याची घटना अंबड शहराजवळ शनिवारी रात्री घडली. विकास दगडूबा चव्हाण (वय २४) आणि सागर दीपक बर्डे (वय २१, दोघेही रा. कुंभारझरी, ता. जाफ्राबाद, जि. जालना) अशी मृतांची नावे आहेत. शुभम बहुले हा गंभीर जखमी झाला आहे. तिघेही मढी येथे कानिफनाथाच्या दर्शनासाठी जात होते. विकास चव्हाण आणि सागर बर्डे हे दोघे कारने जालन्याहून बीडकडे जात होते. तर ट्रक हे बीडहून येत होते. अंबड शहराजवळ आल्यावर ट्रक व कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघेजण जखमी झाले. स्थानिक नागरिक गणेश जगताप यांनी तत्काळ पुढाकार घेऊन दोघांनाही उपचारासाठी अंबड
_________________________________________
दोघांनाही वडील नाहीत दोघे मयत हे जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथील रहिवासी आहे. मयतापैकी विकास दगडूबा चव्हाण याला वडील नसून तो आपल्या आईचा एकमेव आधार होता. त्याच्या अशा अचानक अपघाती निधनामुळे त्याच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत सागर दीपक बरडे याच्याही घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून, त्याच्या पश्चात आई व एक भाऊ आहे. तिघेही अविवाहित आहे. ___________________ येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल पाटील यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी संदीप कुटे, भरत कसरे, विजय केंद्रे आणि राम मते यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना तातडीने अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या एम.एल.सी. पत्राच्या आधारे अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला




