पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक तेगबिरसिंह संधू यांचा सत्कार.

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.5
पोलीसपाटील संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक तेगबिरसिंह संधू यांची भेट घेवून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी जाफराबाद तालुका पोलीस पाटलाच्या विविध मागण्यांसदर्भात पोलीस अधीक्षक श्री. संधु यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी मानधनावर आणि पोलीस पाटलांच्या कामकाजावर चर्चा करण्यात आली तसेच गावातील कायदा सुव्यवस्था व परिसरातील अवैध धंद्याबाबत चर्चा ही करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक श्री. संधू यांनी गावातील अवैध धंद्याबाबत पोलीस पाटलांनी वेळीच पोलीस प्रशासनाला कळविण्याच्या सुचना केल्या. व पोलीस पाटलांनी आपल्या कामात सतर्क रहावे व पोलिस आणि महसूल विभागाला सहकार्य करून वाळु माफीया व गौण, खनिज सरकार, कोणी विना परवगीचे गौण खनिन, आनले पुर्ण जास्त प्रमाणात दड आरारून कायदेशिर कार्यवाही केल्या जाईल व वाहन परवाना सुध्दा रद्द करून वाहन चालकना परत दिल्या जाणार ‘नाही, कुणी चोरून लपुन मटका व दारूचे व्यवसाय करित असेल अश्या विरुद्ध कडक कार्यवाही केल्या जाईल असे सांगितले.
