pub-7425537887339079
ब्रेकिंग

खेळाडूंनी खेळ हा खेळ भावनेने खेळावा. आयु. दादासाहेब मस्के

0 4 9 7 4 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.21

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे 1 व जिल्हा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद येथे तालुकास्तरीय कॅरम व योगा 14 17 19 वर्ष आतील शालेय मुले मुली क्रीडा स्पर्धेचे आयोजन सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक सिल्लोड शिक्षण संस्थेचे सर्व सर्वे अध्यक्ष आयुष्यमान दादासाहेब मस्के यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करीत असताना खेळाडूंनी प्रामाणिकपणे जिद्दीने चिकाटीने खेळाडू ने खेळ भावना मनात ठेवून खेळ खेळावा व तसेच प्रत्येक शाळेतील क्रीडा शिक्षकांनी खेळाडूंना विविध खेळांचे प्रशिक्षण द्यावे हेच खेळाडू आपल्या तालुक्याचे जिल्ह्याचे विभागाचे व राज्याचे नेतृत्व करतील तसेच खेळाच्या नियमांचे पालन करून, प्रतिस्पर्ध्याचा आदर राखून, विजयात नम्रता आणि पराभवात खिलाडूवृत्ती ठेवून खेळणे म्हणजे खेळभावना असे प्रतिपादन केले .
या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीमध्ये उपप्राचार्य डॉ.सुनील मेढे , कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा विनोद हिवराळे तालुका क्रीडा संयोजक श्री एकनाथजी सुरवसे , प्राध्यापक उदय ओझरकर, प्राध्यापक वाहेद पटेल, प्रा. शिवाजी वैद्य, तालुका आलेले सर्व क्रीडा शिक्षक , राजेश शेवाळे आकाश छडीदार शेख युनूस ,समाधान सुरुशे, विजय मोहिते , मुनीमाणिक सर वाघमारे सर इत्यादी होते तालुक्यातील सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद न्यू हायस्कूल जाफराबाद ज्ञानसागर शिपोरा अंभोरा ज्ञानसागर जाफराबाद जे बी के विद्यालय टेंभुर्णी राजमाता इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल जाफराबाद हनुमान खेडा विद्यालय इत्यादी शाळांनी सहभाग नोंदविला
. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक अनिल वैद्य यांनी केले…..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 7 4 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे