
0
4
9
7
4
5
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.13
दि. ०४/१०/२०२६ रोजी उरण तालुक्यातील जसखार गावात ग्रामसुधारणा मंडळाची निवडणूक होती. गावामध्ये होणारे उत्सव कोण सांभाळणार मग यात्रा पालखी उत्सव असो किंवा इतर सर्व उत्सव असो हे उत्सव कोण सांभाळणार या साठी निवडणूक रंगली होती. परंतु या निवडणुकीत जसखार गावाच्या राजकारणाची धुरा गेली १५ वर्ष एकहाती सांभाळणारे विद्यमान सदस्य राकेश तांडेल स्वतः सेक्रेटरी पदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरले होते, त्यामुळे ही निवडणूक सर्व पक्षांसाठी आणि नेत्यांसाठी प्रतिष्ठेची झाली होती. या साधारण अशा निवडणुकीला वेगळा रंग देत या निवडणुकीत आमदार महेशशेठ बालदी यांचा भाजप पक्ष, माजी आमदार मनोहर भोईर यांचा शिवसेना ऊ बा ठा पक्ष, कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचा कांग्रेस व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे यांचा पक्ष हे सर्व पक्ष एकत्रित येत सर्व मोठे नेते पुढारी पदाधिकारी यांनी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचे ठरविले व एका बाजूला एकटा राकेश तांडेल अशी निवडणूक रंगली होती.या निवडणुकीत सर्व पक्षांनी आपली ताकत पणाला लावली परंतु विद्यमान ग्राम.सदस्य राकेश तांडेल हे प्रचार कराताना दिसले नाहीत त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी वाटू लागली होती व राकेश तांडेल यांना २५ मते सुद्धा पडू देणार नाही असे विरोधक वल्गना करू लागेले होते.परंतु रविवारी संध्याकाळी ५:१५ वाजता ही निवडणूक जेव्हा पार पडली तेव्हा चित्र मात्र वेगळे होते. मतदान मोजणी झाली असता सेक्रेटरी पदाचे विजयी उमेदवार सूरज कडू यांना ६५ मते मिळाली व राकेश तांडेल यांना ५४ मते मिळाली असून त्यांचे मित्र अक्षय पाटील हे मोजणी संपताना आले असल्या मुले त्यांचे मत ग्राह्य पकडले नाही अशी एकूण ५५ मते राकेश तांडेल यांना मिळाली व सूरज कडू यांचा १० मतानी विजय झाला आणि सूरज कडू यांचे विजय होताच राकेश तांडेल यांनी त्यांना आनंदाने मिठी मारली व शुभेच्छा दिल्या. राकेश तांडेल यांच्या चेहऱ्यावर हे आनंद पाहून तिथे जमलेला संपूर्ण गाव सुन्न झाला. त्याचे कारण ही त्यांनी तसे सांगितले कारण सर्व नेते ५ पक्ष मोठमोठे पदाधिकारी एकत्र येऊन सुद्धा राकेश तांडेल यांना हारवू शकले नाहीत, त्यांची हार ज्या १० मतानी झाली ती १० मत म्हणजे २ मित्रांनी दिलेला दगा होता. त्यामधील एक ज्याला राकेश तांडेल यांनी रोजगार दिला होता तर दुसरा म्हणजे ज्याला राकेश तांडेल यांनी विधानपरिषदेचा निवडणुकीत खुप मोठी मतांची मदत केली होती, ही दोन्ही लोक विरोधात जाऊन त्यांनी आपल्या सोबत आपले ५ कुटुंबीय नेले होते आणि ही निवडणूक समोर समोर बोट उंच करून मत देण्याची पद्धत असल्यामुळे ते १० लोक समोर दिसत होती.
त्यामुळे राकेश तांडेल यांनी हसत हसत सांगितले की संपूर्ण गाव एकत्र येऊन सुद्धा मला हरवू शकले नाही. तसेच त्यांनी जिंकलेल्या उमेदवार सूरज कडू तथा अध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार रणजीत पाटील जे की त्यांचे अगदी चांगले मित्र आहेत त्या दोघांना शुभेच्छा देत पुढील सर्व उत्सव गुण्यगोविंदाने व आनंदाने पार पाडा अशा शुभेच्छा दिल्या.तसेच या उत्सवांमध्ये आपल्या कडून लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. राकेश तांडेल यांना एक प्रश्न विचारण्यात आले की पुढल्या वर्षी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकी बद्दल आत्ता आपली काय भूमिका असेल असे विचारले असता ही निवडणूक न लढविण्याचे संकेत दिले आहेत. व आत्ता जशा प्रकारे सोनारी गावचे माजी सरपंच महेश कडू यांनी सर्व पक्षाची युती करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली तशीच भूमिका त्यांनी २०२७ च्या निवडणुकीत बजवावी आणि ऊ बा ठा गटाचा सरपंच निवडून द्यावा व ही निवडणूक बिनविरोध पार पाडावी अशा शुभेच्छा दिल्या व त्याचसोबत गावातील दादांनी २ महिने अगोदर उत्सव कमिटी अध्यक्ष रविशेठ ठाकूर यांना सरपंच व्हा असा गोड संदेश दिला होता त्यामुळे जर रवीशेठ ठाकूर यांनी जर निवडणूक लढवली तर राकेश तांडेल यांनी देखील त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
पण या सर्व घटनेत एक मात्र स्पष्ट दिसत आहे,एकूण झालेल्या मतदानापैकी ५ पक्ष सर्व नेते मिळून त्यांना मिळाली मते ५४% आणि राकेश तांडेल यांना मिळाली मते ४६% . मग तुम्हीच ठरवा नक्की जिंकला कोण ? कारण एकट्याला हरवण्यासाठी एवढा सगळ्यांना एकत्र व्हायला लागला त्यासाठी मात्र गावात त्या सर्वांचा हशा उडाला आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
4
9
7
4
5




