जालना येथे अनोळखी इसमाचा मृत्यू; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि.4
जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे उपचारा दरम्यान एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. याबाबत पोलिसांनी नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. बेदकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एम.एल.सी. पत्रक क्रमांक MLC/RNB/3227/2026, दिनांक 1 मे 2026 अन्वये सुमारे 40 वर्षे वयोगटातील एक अनोळखी पुरुष लक्कड कोट, जालना येथून उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू (आ.मृ.) क्रमांक 23/2026, कलम 194 भा.ना.सु.स. नुसार नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
मृत व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. वय अंदाजे 40 वर्षे, उंची सुमारे 5 फूट 4 इंच, बांधा सडपातळ, रंग सावळा, केस काळे व मध्यम लांबीचे, डोळे काळे, चेहरा लांबट, दाढी नसून बारीक मिशी आहे. नाक सरळ असून उजव्या डोळ्यावर जुन्या जखमेचा खुण दिसून येतो. त्याच्या उजव्या हातावर “संजु सोमाजी डुकरे” असे अस्पष्ट गोंदलेले आहे. अंगावर पिवळ्या रंगाचा फुल शर्ट, निळ्या रंगाची लोअर (ज्यावर इंग्रजीत “V.L” असे लिहिलेले), तसेच चॉकलेटी रंगाचे अंडरवेअर होती.
सदर इसमाची अद्याप कोणतीही ओळख पटलेली नसून त्याचे नातेवाईकही समोर आलेले नाहीत. त्यामुळे संबंधित व्यक्तीबाबत कोणाकडे काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ जालना पोलिसांशी संपर्क क्रमांक: ०२४८२-230400, 7972075589 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




