डॉ प्रकाश मांटे यांची राजपत्रित अधिकारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.6
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी (डायट) संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना येथील वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रकाश मांटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सद्यस्थितीत डॉ प्रकाश मांटे हे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना येथे वरिष्ठ अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी डॉ प्रकाश मांटे हे वसंतराव नाईक अध्यापक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तेंव्हा विनाअनुदानित महाविद्यालय संघटनेमध्ये ते सक्रिय होते. छत्रपती संभाजीनगर व बुलढाणा येथे त्यांनी अधिव्याख्याता म्हणून कार्य केले आहे व वर्ग एक पदी पदोन्नतीने ते नुकतेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना येथे रूजू झाले आहेत. नाशिक येथे दिनांक 2 मे 2026 राज्य कार्यकारिणीची निवडणूक संपन्न झाली.त्यात डॉ प्रकाश मांटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचा सत्कार डायट जालना येथील वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ प्रमोद कुमावत यांच्या हस्ते जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना येथे करण्यात आला. यावेळी राजपत्रित अधिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार शिंदे, वसंतराव नाईक अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनंत चौधरी, अधिव्याख्याता डॉ. श्रीहरी दराडे, सय्यद अख्तर,भारत सूर्यवंशी, विषय सहायक विशाल सिरसाठ, संतोष मुसळे, कैलास तिडके यांची उपस्थित होती. त्यांच्या या निवडीबद्दल डायट प्राचार्य श्रीमती सान्वी देशमुख, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.विक्रम सारूक, डॉ.वैशाली जहागीरदार, डॉ प्रेरणा मोरे, अधिक्षक सुनील पत्की, मिलिंद भगत, बाबासाहेब राठोड, संघपाल झिने, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य विष्णू तारगे, विजय आदनाक, इरशाद शेख, गोपाळ खोपडे, पठाण, श्रीमती सिद्दीकी आदींनी अभिनंदन केले आहे.




