शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी अखेर शिक्षकांना दिला न्याय.
मराठवाडा शिक्षक संघाच्या उपोषणाला यश

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.7
मोरेश्वर शिक्षण संस्था संचलित शांतीई प्राथमिक विद्यालय बजाज नगर छत्रपती संभाजी नगर या शाळेतील सहशिक्षक श्री रावसाहेब बोरसे श्री अजित जाधव श्री सागर सूर्यवंशी श्री रामेश्वर गोराडे, श्री रवींद्र मगर श्री सचिन मुसळे आणि संभाजी जाधव गेल्या दोन दिवसापासून जिल्हा परिषद प्राथमिक छत्रपती संभाजीनगर येथे आमरण उपोषणास बसलेले होते त्यांच्या सर्व न्याय हक्क मागण्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण व कार्यालयीन अधीक्षक प्रदीप राठोड यांनी सर्व मागण्या मान्य असल्याचे पत्र देऊन उपोषण करता शिक्षकांना लिंबू पाणी देऊन हे उपोषण अखेर सोडविले. हे मराठवाडा शिक्षक संघाच्या भाई चंद्रकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण राबविण्यात आले होते.शाळेतील मुख्याध्यापकांनी नियमबाह्यरीत्या तुकडी वर्गाचा वाढीव टप्पा पगार मूळ वर्गाला दिलेला आहे. तो वाढीव टप्पा शासन निर्णयानुसार तुकडी वर्गांच्या शिक्षकांच्या पगारी खात्यावर जमा करण्यात यावा. सेवा पुस्तकाची दुय्यम प्रत अद्यावत करून तात्काळ शिक्षकांना देण्यात यावी. शाळेतील ज्या शिक्षकांनी बारा वर्षाचा कालावधी पूर्ण केलेला आहे व वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे अशा शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. शाळेत रुजू करून घेत असताना शाळेतील मुख्याध्यापक, संस्था सचिव व अध्यक्षा यांनी सर्व कर्मचाऱ्यांकडून दहा कोऱ्या कागदांवर स्वाक्षरी करून घेतलेल्या आहेत. तसेच शाळेतील सर्व शिक्षकांना धमकावून स्वाक्षरी सह राजीनामा व काही आक्षेपार्ह मुद्दे लिहून घेऊन त्यावर दिनांक नसलेले १५ कागदपत्रे तात्काळ देण्यात यावेत. शाळेतील मूळ वर्गावरील शिक्षक व तुकडी वर्गावरील शिक्षक यांना समान कामे वाटप करण्यात यावी. या प्रमुख मागणीसाठी उपोषण होते. डॉ उमाकांत राठोड, नवनाथ मंत्री, अशोक ढमढेरे, विनोद केनेकर, कृष्णा गोंडे, बाळू पवार, शैलेश पाटील, विलास चव्हाण, डॉ. पद्माकर पगार, मनोज चव्हाण, सोनाली गव्हाणे, स्वाती बोंडे, रेखा साकळे, अरुणा चौधरी, सविता हिंगे, शितल कवडे संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला होता.




