जालन्यात येत्या 15 दिवसात सी एन जी उपलब्ध होणार — आ.अर्जुन खोतकर. चिखली खामगाव कडे सी एन जी झाले सुरू.

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.19
सी एन जी ची सुविधा आपल्या जालना जिल्ह्यात नसल्याने ही सुविधा सुरू करण्याची मागणी वाहनधारक मोठ्या प्रमाणात करत होते. कारण जालना जिल्हा इतका मोठा आणि सदन असून येथे ही सुविधा नसल्याने वाहन धारक सारखी मागणी केल्याने या विषयाकडे स्वतः हा आमदार अर्जुन खोतकर यांनी लक्ष्य घातले असून येत्या 15 ते 20 दिवसात आपल्या जालना येथे राजूर रोड वरील समृध्दी पुलाच्या खाली असलेल्या श्री फिरोज लाला तांबोळी यांच्या पेट्रोल पंपावर ही सुविधा सुरू होणार असल्याची माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी फोन मार्फत आमच्या प्रतिनिधी कडे दिली. जालना जवळील सिंदखेडराजा येथे ही सुविधा सुरू झाली असून बुलढाणा जिल्ह्यात अजून दोन ठिकाणी सुरू झाली असून चिखली येथे ही सुविधा दोन ठिकाणी सुरू झाले असून या भागातील वाहन धारक यांच्या साठी ही चांगली बाब झाली आहे.जालना जिल्ह्यातील येणाऱ्या काही दिवसात अजून चार ठिकाणी हे सी एन जी सेंटर सुविधा सुरू होणार असल्याची माहिती असून लवकर सुरू करण्याची मागणी या वेळी वाहनधारक यांनी केली आहे. चौकट आमची बऱ्याच दिवसा पासून ही मागणी होती की जालना येथे सी एन जी सुविधा भेटली पाहिजे. कारण डिझेल आणि पेट्रोल सारखे वाढत आहे आणि गाडी ला अवरेज भेटत नाही. या मुळे खूप चांगले होईल. सी एन जी सुरू होत असल्यामुळे आनंद होत आहे. (अलकेश सोमाणी वाहन धारक.)

