शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करावा.जिनेंद्र काळे
जिल्हा परिषद प्रशालेत तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.12
शिक्षकांनी अभ्यासाशी तंत्रज्ञानाची सांगड घालून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करावा असे प्रतिपादन जाफराबाद पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी जिनेंद्र काळे यांनी केले.जाफराबाद येथे जिल्हा परिषद प्रशालेत आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष विनोद कळंबे, मुख्याध्यापक उमेश दुनगहू,साधन व्यक्ती नारायण पिंपळे, जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेचे संचालक किरण तिडके, सावता तिडके, प्रा.निलेश भोसले, प्रा.मनिष बनकर, प्रा.सारिका जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्राथमिक गटात 42 शाळांनी तर माध्यमिक गटात 21 शाळेने सहभाग नोंदवला. प्राथमिक गटामध्ये लिटिल स्टार इंग्लिश स्कूलने प्रथम,जिजाऊ इंटरनॅशनल स्कूल ने द्वितीय तर भास्करराव शिंगणे विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. माध्यमिक गटात ज्ञानसागर विद्यालय जाफराबाद ने प्रथम, पी.एम. श्री. जिल्हा परिषद प्रशाला जाफराबाद ने द्वितीय तर माहोरा येथील पी.एम.श्री जिल्हा परिषद प्रशालेने तृतीय क्रमांक पटकावला. प्राथमिक शिक्षक गटात दत्ता गवळी यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
निरीक्षक म्हणून प्रा भोसले, प्रा मनीष बनकर, प्रा श्रीमती पाटील यांनी काम पाहिले.कार्यक्रमाचे अंकुश इंगळे यांनी केले तर आभार बळीराम उभारहंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवहरी ढाकणे, शिवाजी देशमुख,विजय वासरे, मनोज साळवे अर्जुन धारे, ओम देशमुख संजय केवट, विष्णु मुनेमानिक, गणेश धनवई, लक्ष्मी पेद्दी, सुखदा पाटील,सुनिता नागरे यांनी परिश्रम घेतले.यावेळी तालुक्यातील शिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.



