pub-7425537887339079
ब्रेकिंग

जिल्हा निर्देशांकात जालना जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

● राज्यात प्रथम क्रमांकाने सन्मानित "● जिल्हा प्रशासनातील गुणवत्ता व उत्कृष्टतेचा सन्मान

0 4 1 2 0 0
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.24 

दै. लोकसत्ताच्या जिल्हा निर्देशांक या उपक्रमाचे यंदा चौथे वर्ष असून सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशिलाच्या आधारे पुणे येथील विख्यात गोखले अर्थशास्त्र संस्थेकडून विविध जिल्ह्याच्या कामगिरीचे विश्लेषण केले गेले. त्यानूसार जालना जिल्ह्याने विविध विकास निर्देशांकाबाबत प्रथम क्रमांक नोंदविला आहे. त्यानूसार जालना जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत ‘गट-1’ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन दि.20 मार्च 2026 रोजी हॉटेल ताज विवांता मुंबई येथे करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
विशेषतः प्रशासकीय गतिमानता आणि लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यात जिल्हा प्रशासनाला मोठे यश आले आहे. या लक्षणीय यशाबद्दल जिल्ह्याचा विशेष सन्मान करण्यात आला असून जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी हा मानाचा पुरस्कार व सन्मानचिन्ह स्वीकारले आहे. या यशाबद्दल बोलताना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, हा बहुमान जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि जिल्ह्यातील जनतेच्या सांघिक प्रयत्नांचे फळ आहे. भविष्यातही जालना जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत अग्रस्थानी ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जालना जिल्ह्याला मिळालेल्या या गौरवमुळे सर्व स्तरातून प्रशासनाचे कौतुक होत असून मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 2 0 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे