pub-7425537887339079
ब्रेकिंग

जालना येथे 27 मार्च रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

0 4 1 2 0 0
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.25

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना आणि हुतात्मा जनार्दनमामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था , जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवार, दि. 27 मार्च 2026 रोजी हुतात्मा जनार्दनमामा नागापूरकर शासकीय, जालना येथे सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भव्य ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.
रोजगार मेळाव्याद्वारे विविध क्षेत्रांतील अंदाजे 200 पेक्षा अधिक रिक्त पदांवर भरती केली जाणार असून, यासाठी पाचवी ते दहावी उत्तीर्ण, बारावी, पदवीधर आणि आय.टी.आय.च्या सर्व ट्रेड्समधील पात्र उमेदवारांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मेळाव्यात प्रामुख्याने फिल्ड असिस्टंट मॅनेजर, असिस्टंट ब्रांच मॅनेजर, कॅशियर, टेक्निशियन, ऑपरेटर, फिल्ड एक्झिक्युटिव्ह, हेल्पर, अप्रेन्टिस ट्रेनी आणि ए.सी.सी. मशीन ऑपरेटर यांसारख्या विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
रोजगार मेळाव्यात एकूण 9 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून पात्र उमेदवारांच्या चाचण्या व मुलाखती घेणार आहेत. यामध्ये जालना येथील खंडेलवाल ज्वेलर्स (15 पदे) व भारत फायनान्शियल इन्क्लुजन लि. (20 पदे), तसेच अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (20 पदे) यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमधील बजाज ऑटो लि. (50 पदे), संजीव ऑटो लि. वाळूज (15 पदे), एंड्युरन्स टेक्नॉलॉजी लि. वाळूज (5 पदे) आणि धूत ट्रान्समिशन प्रा. लि. (30 पदे) या कंपन्या मोठ्या प्रमाणात पदभरती करणार आहेत. यासोबतच बजाज ऑटो लि. चाकण, पुणे (30 पदे) आणि एथर एनर्जी लि. बेंगलोर (15 पदे) या कंपन्यांचे प्रतिनिधीही भरती प्रक्रियेसाठी उपस्थित राहतील.
इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी किमान पाच प्रतींमध्ये आपला रिझ्युमे (बायोडाटा), मूळ शैक्षणिक कागदपत्रे, आधार कार्ड आणि सेवायोजन नोंदणीच्या छायाप्रतींसह सकाळी 9 वाजता मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहावे. ज्या उमेदवारांनी अद्याप सेवायोजन नोंदणी केलेली नाही, त्यांनी महास्वयंमच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.rojgar.mahaswayam.gov.in) किंवा केंद्र शासनाच्या (www.ncs.gov.in) पोर्टलवर नोंदणी करून जॉब फेअर पर्यायामध्ये जालना जिल्हा निवडावा. तेथे (स्पेशल जॉब फेअर- 6 (2025-26) जालना ) या लिंकवर क्लिक करून पात्रतेनुसार पदांसाठी अप्लाय करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जासाठी किंवा इतर कोणत्याही तांत्रिक अडचणीसाठी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२४८२-२९९०३३ वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, जालना यांनी केले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 2 0 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे