pub-7425537887339079
ब्रेकिंग

श्रीमती जे.बी.के. विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा.

0 4 9 7 4 5
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.18

टेंभूर्णी शहरातील नामांकित नवभारत शिक्षण संस्था द्वारा संचालित श्रीमती.जे.बी. के.विद्यालय व नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयात १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, सर्व प्रथम सरदार वल्लभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले, विद्यालयाचे सास्कृतिक कार्यक्रम प्रमुख एस. बी.बोरकर सर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी नवभारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष जमिर शेख सर,हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, एस. बी. बोरकर, पर्यवेक्षक भिवसन ससाणे सर, विष्णु जाधव सर,हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.विद्यालयातील कु.गायत्री चव्हाण या विद्यार्थीनीने स्वातंत्र्य संग्रामात प्राणाची आहुती देणार्‍या हुतात्म्यां बद्दल माहिती विशद केली,तर काही विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर गीते सादर केले. प्रा. सुनील बनसोडे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दैदिप्यमान इतिहास मांडला.कार्यक्रमाचे सुत्र संचालन रविंद्र मोरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र जगताप सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश इंगळे, क्रिडाप्रमुख कैलास भूतेकर, राजेश शेवाळे, समाधान कांबळे, दत्ता ऊखर्डे, दिनकर ऊखर्डे, वासुदेव क्षिरसागर प्रा. रामदास भांगे, प्रा.कैलास जाधव. प्रा. गजानन धोटे.प्रा.डॉ. आनंद जाधव,उज्वला आवटी, एफ.ए.शेख, मंजुषा भिलावेकर,माधुरी पाटील, ज्योतीताई जाधव, निशिगंधा राजपुत,विजया शिल्लार सुनील सकुंडे, राजुभाऊ डोमळे, नागोराव देशमुख, दिपक देशमुख आदींनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 7 4 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे