pub-7425537887339079
ब्रेकिंग

कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन ही काळाची गरज – मुरलीधर भोयर

0 4 9 7 4 5
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.17

हिंदू समाज संस्था संचलित कै. बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालयात ‘कचऱ्याचे व्यवस्थापन’ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक मुरलीधर भोयर यांनी विद्यार्थ्यांना कचऱ्याचे प्रकार, त्याचे वर्गीकरण तसेच कचऱ्यामुळे होणारे पर्यावरणीय दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी भोयर यांनी मानवनिर्मित व निसर्गनिर्मित कचरा याबाबत माहिती देताना प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर होणाऱ्या गंभीर परिणामांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. घरातून बाहेर पडणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या व इतर प्लास्टिक वस्तू नाल्या, सांडपाणी वाहिन्या व नद्यांमार्फत अखेरीस समुद्रापर्यंत पोहोचतात. त्यामुळे जलप्रदूषणासह पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कचऱ्याचे ओला, सुका, सॅनिटरी आणि घातक कचरा असे वर्गीकरण करून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत व बायोगॅस तयार करता येतो, तर प्लास्टिक, बॅग, बूट आदी सुक्या कचऱ्याचे पुनर्वापर व पुनर्चक्रण करता येते. ‘टाकाऊपासून टिकाऊ’ वस्तू तयार करण्याची संकल्पना विद्यार्थ्यांनी अंगीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच सॅनिटरी कचरा आणि घातक कचरा इतर कचऱ्यापासून वेगळा ठेवण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. प्लास्टिकचा वापर कमी करून त्याऐवजी स्टीलच्या डब्यांचा वापर करण्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
मार्गदर्शक भोयर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत कचरा व्यवस्थापनासंदर्भात विविध प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्नांची उत्तरे देत सहभाग नोंदविला. योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी भेटवस्तू देऊन प्रोत्साहन दिले. ओला कचरा, सुका कचरा, ई-कचरा आदींचे वर्गीकरण याबाबत विद्यार्थ्यांनी योग्य उत्तरे दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी समाजामध्ये कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मीनाक्षी कुलकर्णी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप इंगोले यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 7 4 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे