pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जाफराबाद तालुक्यातील वंचित महसूल मंडळांचा समावेश दुष्काळी यादी मध्ये करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्या धरणे आंदोलन

शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे रामधन कळंबे यांचे आवाहन.

0 4 0 4 9 1
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.30

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी कुंभारझरी आणि जाफराबाद महसूल मंडळाचा समावेश ओल्या दुष्काळामध्ये करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी ता 31 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने जाफराबाद येथे तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असून यामध्ये उपरोक्त तीनही महसूल मंडळातील शेतकरी आणि ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाफराबाद तालुकाध्यक्ष रामधन कळंबे यांनी केले आहे. याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री कळंबे यांनी म्हटले आहे की जाफराबाद तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली असून अजूनही अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस सुरूच असल्यामुळे या अस्मानी संकटामुळे तालुक्यातील शेतकरी हपकला आहे. राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ओल्या दुष्काळाच्या यादीत जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी कुंभारझरी आणि जाफराबाद मंडळ या यादीतून वगळण्यात आले आहे. या मंडळात देखील मोठ्या पद्धतीने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून या तीनही मंडळांचा ओल्या दुष्काळात समावेश करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वाखाली जाफराबाद येथे शुक्रवारी ता .३१ सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले असून यासाठी वंचित शेतकरी आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री कळंबे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सेल च्या वतीने करण्यात आले आहे.

4/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 9 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे