pub-7425537887339079
ब्रेकिंग

भाजपा जालना शहराच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन, वृक्षारोपण व जिल्हा कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

0 4 6 0 6 8
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.4

भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ तथा अखंड भारताचे पुरस्कर्ते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, जालना शहराच्या वतीने सोमवार, दि. ०६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान (फुलंब्रीकर नाट्यगृह जवळ), जालना येथे प्रतिमा पूजन, वृक्षारोपण तसेच जिल्हा कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार असून वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच आगामी संघटनात्मक उपक्रम, विविध कार्यक्रमांचे नियोजन आणि कार्यकर्त्यांशी संवाद या अनुषंगाने जिल्हा कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन भाजपा जालना महानगरचे जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 0 6 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे