pub-7425537887339079
ब्रेकिंग

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत जे.बी.के. विद्यालयाने मिळविले द्वितीय स्थान.

0 4 9 7 4 4
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.10

जाफ्राबाद – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा नुकतीच जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे उत्साहात पार पडली.

दि. 5 ऑक्टोबर 2026 रोजी झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील संघांनी सहभाग नोंदविला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यांमध्ये जाफ्राबाद तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रीमती जे.बी.के. व नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 14 वर्षे वयोगटातील संघाने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

जे.बी.के. च्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक चढाया आणि भक्कम पकड यांच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. अंतिम सामन्यात अगदी थोड्या फरकाने पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांनी दाखविलेले कौशल्य कौतुकास्पद ठरले.

विजेत्या संघामध्ये सार्थक जमधडे, अनिकेत जाधव, प्रभू कातखडे, फरान शेख, सोहम खरात, रितेश माघाडे, भाविक गडकर, समर्थ मुळे, प्रवीण गोफने, जाकीर पठाण, अबूबकर शेख, अलोक सपकाळ या खेळाडूंचा समावेश होता. या सर्व खेळाडूंनी आपल्या चपळाईने आणि सांघिक खेळाने जाफ्राबाद तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

या दैदिप्यमान यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य कुलकर्णी सर, पर्यवेक्षक ससाने सर, क्रीडा प्रमुख भुतेकर सर, तसेच क्रीडा मार्गदर्शक शेवाळे सर यांनी सर्व उपविजेत्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 7 4 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे