कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांवर प्रेरित होऊन युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना समाजासाठी कार्यरत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे यांनी पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने युवकांनी प्रयत्न करावेत तसेच समाजाभिमुख दृष्टिकोनातून कार्य करावे असे सांगितले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे माजी रायगड जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा.तुलसीदास मोकल ( सी डी देशमुख महाविद्यालय, रोहा) हे उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे, राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका, राष्ट्रीय सेवा योजनेत होणारी विविध उपक्रम तसेच त्यातून विद्यार्थ्यांना होणारे फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. व राष्ट्र उभारणीत राष्ट्रीय योजनेचे महत्त्व असल्याचे विशद केले. कार्यक्रमात वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ.पराग कारुलकर व डॉ. एम.जी. लोणे उपस्थित होते. सूत्रसंचालन राष्ट्रीय योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्ता हिंगमिरे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार डॉ. हनुमंत जगताप यांनी व्यक्त केले. विनिता तांडेल व दिपू यादव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते.