पंचक्रोशित सुप्रसिद्ध असणाऱ्या गव्हाणच्या शांतादेवीची यात्रा शनिवारपासून (ता. ११) सुरू झाली. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेला शेकडो वर्षांची धार्मिक व ऐतिहासिक परंपरा आहे. आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत हे शांतादेवीचे निस्सीम भक्त आहेत. दर मंगळवारी ते न चुकता शांतादेवीचे दर्शन घेतात. त्यानंतरच दिवसभरातील कामांना सुरुवात करतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते हे नित्यनेमाने करतात. गेली चार-पाच वर्षे महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत या दाम्पत्यातर्फे शांतादेवीला यात्रेच्या दिवशी सोन्याचा हार अर्पण केला जातो. शांतादेवी नवसाला पावते, ही भाविकांची भावना आहे. परिसरातील नागरिकांची शांतादेवीवर अपार श्रद्धा आहे.
यंदा तर महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई आजोबा झालेत. त्यांच्या घरात समायरा हिच्या रूपाने नात जन्माला आलेली आहे. त्यामुळे यंदा शांतादेवीची यात्रा आणि नात समायरा हिच्या जन्माचा दुग्धशर्करा योग असल्याने घरत दाम्पत्य अत्यानंदात आहेत. त्यामुळे शनिवारी (ता.११) सकाळी महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत, नात- समायरा, सोनाली घरत-चौधरी, मयूरेश चौधरी यांनी सहपरिवार सकाळीच शांतादेवीची ओटी भरून पूजा केली, मनोभावे दर्शन घेतले आणि सोन्याचा हार अर्पण केला. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “मी शांतादेवीचा निस्सीम भक्त आहे. आई-वडील, गणपती बाप्पा, शांतादेवी यांचे अपार ऋण माझ्यावर आहेत. त्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, पण प्रयत्न करू शकतो. पूर्वी शांतादेवीला सावकार दागिने द्यायचे, हे लहानपणी मी पाहायचो. तेव्हा मला कुतूहल वाटायचे. आज मला आई-वडील, गणपती बाप्पा, शांतादेवी यांच्यामुळे सोन्याचे दिवस आलेत. त्यामुळेच मी ह्रदयाच्या अंतःकरणापासून शांतादेवी सोन्याचा हार अर्पण केला आहे.”
एमबीबीएस पदवी पूर्ण केल्याबद्दल डॉ. साळवे, डॉ. मोठे यांचा मानव सेवा मंडळातर्फे सत्कार
8 hours ago
‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन 29 जुलै रोजी जालन्यात विविध सांस्कृतिक, साहित्यिक व सर्जनशील स्पर्धा; युवकांना सहभागाचे आवाहन
8 hours ago
शालेय बस-व्हॅनसाठी नवे नियम लागू; सुरक्षा उपाय अनिवार्य 23 ते 30 जुलैदरम्यान विशेष तपासणी मोहीम; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई
8 hours ago
लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला 13 ऑगस्टपासून होणार सुरुवात आयव्हीबीपी संस्थेकडून 1 कोटी लसींचे वितरण
8 hours ago
सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व विद्यार्थी जीवनातच घडते- प्राचार्य डॉ ठक्कर.
8 hours ago
मोरा सागरी पोलीस ठाणे, नवी मुंबई हद्दीत आढळला अनोळखी बेवारस इसमांचे मृतदेह.
8 hours ago
खोपटे येथे मत्स्य शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आणि मत्स्य बीज वाटप कार्यक्रम संपन्न.
8 hours ago
जंतर मंतर दिल्ली येथिल विद्यार्थ्यावरील अमानुष लाठीमार विरोधात उरण मधे निदर्शने.
8 hours ago
श्री साई सेवा मंडळ उरण विभाग तर्फे वृक्षारोपण
8 hours ago
जाफ्राबाद शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी महेबुब खान पठाण