तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत सेठ ई बी के उर्दु विद्यालयाने मारली बाजी

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.18
जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी येथील सेठ ई बी के उर्दु विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय इंग्रजी वकूत्व (Elocution) स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
तालुकास्तरीय स्पर्धेतील इयत्ता ५ वी ते ६ वी गटात जुनेरा मोबीन सय्यद हिने प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली. तसेच इयत्ता ७ वी ते ८ वी गटात शिफा अमर पठाण हिने तृतीय क्रमांक संपादन करून उल्लेखनीय यश मिळविले. तसेच इयत्ता ९ वी ते १० वी गटात सबा रहेमान कुरेशी हिने प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली.
तीन्ही विद्यार्थिनींच्या या यशामागे शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, परिश्रम आणि विद्यार्थिनींची मेहनत महत्त्वाची ठरली. शिक्षक शेख साबेर यांनी विद्यार्थिनींना स्पर्धेसाठी विशेष मार्गदर्शन केले.
गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांमध्येही सेठ ई बी के उर्दु विद्यालयाचे विद्यार्थी सातत्याने उल्लेखनीय यश संपादन करीत असून, या यशामुळे शाळेच्या गुणवत्तापूर्ण वाटचालीत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.
विद्यार्थिनींच्या यशामागे शाळेच्या मुख्याध्यापिका शेख सुमैया रोशन यांचे मार्गदर्शन, शिक्षकवृंदांचे प्रयत्न, पालकांचा पाठिंबा आणि ग्रामस्थांचे कौतुक मोलांचे ठरले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवराव देशमुख, उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, सचिव नंदलाल काबरा, कोषाध्यक्ष प्रेमसुख काबरा, संचालक प्रा. दत्तात्रेय देशमुख, ठमाजी भागवत शाळेतील मुख्याध्यापिका शेख सुमैया रोशन, मुख्याध्यापक शेख गयास, शिक्षकवृंद, पालक यांनी तीन्ही विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.


