pub-7425537887339079
ब्रेकिंग

किनवट जिल्‍हात हदगांव तालुक्‍याचा समावेश करु नये – समीर पटेल

0 4 7 9 9 4
[sp_wpcarousel id="1375"]

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.29

नव निर्मित अपर जिल्हाधिकारी किनवट कार्यालयात हदगांव तालुक्‍याचा समावेश करु नये या विषयी आक्षेप दिव्‍यांग विकास संघर्ष समितीचे संस्‍थापक अध्‍यक्ष समीर पटेल यांनी जिल्‍हा व स्‍थानिक प्रशासनाला निवेदन देण्‍यात आले. अपर जिल्‍हाधिकारी किनवट कार्यालयात हदगांव तालुक्‍याचा समावेश करत असल्‍याने या हदगांव तालुक्‍यात भरपुर प्रमाणात दिव्‍यांग व्‍यक्‍ती, वयोवृध्‍द निराधार असल्‍याने व तसेच किनवट हा हदगांव तालुक्‍या पासुन सर्व दुर अंतरावर आहे. व तसेच हदगांव तालुका हा भौगोलीक द्ष्‍टया मोठा असल्‍याने तालुक्‍याचा विस्‍तार हा खुप मोठया प्रमाणात खेडे, वाडया, तांडे, गांव जास्‍त प्रमाणात असल्‍याने त्‍यांचे शैक्षणिक, आरोग्‍य, सामाजिक, शासकिय कामा करीता नांदेड हा सर्व सामान्‍य नागरीकांना करीता सोयीचे ठरते. व तसेच या कामासाठी किनवट शहर फार दुर पडते. आणि हदगांव ते किनवटचे अंतर किमान १२५ ते १५० किलो मिटर प्रवास करण्‍यासाठी किमान ५ ते ७ तास लागतील. व तसेच हदगांव ते किनवट कोणत्‍याही मार्गाने गेले तरी घाटाचे व वन्‍य प्राणी या रस्‍त्‍यावर सतत दिसुन येत असतात. सर्व सामान्‍य माणुस कधी एस टि बसने व इतर खासजगी वाहनाने कधी पोहचेल. व कधी शासकिय काम पुर्ण होईल. व कधी परत घरी येईल. विशेष म्‍हणजे हदगांव ते किनवट या मार्गावर एक ही बस सुध्‍दा उपलब्‍ध नाहीत. आणि दिव्‍यांग, महिला, वयोवृध्‍द व्‍यक्‍ती हा एस टी बसला प्रवास भाडे सवलत असल्‍याने जास्‍त प्रमाणात एस टी बसने प्रवास करत असतो. दिव्‍यांगाला विविध योजनेसाठी लाभ घेण्‍यासाठी आपल्‍या जिल्‍हाच्‍या ठिकाणी जाणे गरजेचे असते. व तसेच शासकिय कामासाठी वारंवार जिल्‍हाच्‍या ठिकाणी जावे लागत असते. त्‍यामुळे दिव्‍यांग व वयोवृध्‍द निराधाराचे खुप हाल हाईल. त्‍याकरीता नव निर्मित अपर जिल्‍हाधिकारी किनवट कार्यालयात हदगांव तालुक्‍याचा समावेश करु नये. या करीता दिव्‍यांग विकास संघर्ष समिती मार्फत विषयी आक्षेप हरकती घेण्‍यात आली आहे. व तसेच हदगांव तालुक्‍याचा समावेश किनवट कार्यक्षेत्रात न करता तो पुर्वी प्रमाणेच जिल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्‍या कार्यक्षेत्रात कायम ठेवावा. अशी मागणी दिव्‍यांग विकास संघर्ष समितीचे संस्‍थापक अध्‍यक्ष समीर पटेल यांनी केली आहे. त्‍यावेळी त्‍यांच्‍या सोबत जमीर पटेल, अजिंक्‍य अशोक चव्‍हाण, कुबेर राठोड, फारुख कुरेशी,पवन भोरे, निहाल पटेल, अहेमद भाई, रमेश गोडबोल, शबीर बेग, गजानन शिंगणे, शेख इमरान, रसुल कुरेशी, सलीम भाई, धुरपतर सुर्यवंशी, शेख साजिद,, नासेर पेंटर, बंडु पाटे आदीसह यावेळी उपस्थित होते…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 9 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे