pub-7425537887339079
ब्रेकिंग

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या चार खेळाडूची सायकलिंग मध्ये विभागास्तरावर निवड.

0 4 9 6 9 5
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.11

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे एक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद जालना तसेच एस आर पी एफ ग्रुप जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय सायकलिंग व स्केटिंग या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 3 जालना चे समादेशक संजय बारकुंड साहेब हे होते प्रमुख उपस्थितीमध्ये रवी राऊत, गजानन डोंगरे , विजय आगळे , प्रा. वाहेद पटेल,
प्रा. शिवाजी वैद्य ,ज्ञानेश्वर जाधव , मुरलीधर जाधव , सुरज शिंगणे , आकाश छडीदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सायकलिंग 14 ,17, 19 वर्षातील मुला मुलीचे सायकलिंग स्पर्धा या खेळाचे उद्घाटन झाले .

या खेळामध्ये सिद्धार्थ महाविद्यालयाच्या चार खेळाडूची विभागीय स्तरीय निवड झालेली आहे या स्पर्धा छत्रपती संभाजीनगर शेंद्रा या 15 ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे
विभागीय स्तरावर निवड झालेल्या खेळाडूची नावे श्रद्धा शिंगणे, तृप्ती जाधव , ऋतुराज जाधव, राहुल लोखंडे या खेळाडूची विभागात स्तरावर निवड झालेली आहे

या यशाबद्दल सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष मा .दादासाहेब म्हस्के स्के, सचिव मा.डाॅ.राहुलजी म्हस्के स्के , प्राचार्या डॉ. सविता सिनगारे उपप्राचार्य प्रो.डॉ. सुनील मेढे , कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.विनोद हिवराळे , उपप्राचार्य डॉ. श्याम सरजे , महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख प्रा अनिल वैद्य,जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नरेंद्र पवार , लता लोंढे, आरती चिल्लारे , सिद्धार्थ कदम, श्री जोगदंड सर, प्राध्यापक शिवाजी वैद्य यांनी व सिद्धार्थ कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूचे अभिनंदन करून पुढील क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व तालुक्यातून व जिल्ह्यातून या सर्व खेळाडूचे अभिनंदन व कौतुक होत आहे या सर्व खेळाडूंना मोलाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन प्राध्यापक उदय वझरकर , प्रा.वाहेद पटेल, प्रा. शिवाजी वैद्य आणि आकाश छडीदार यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 6 9 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे