pub-7425537887339079
ब्रेकिंग

जालना मुख्य टपाल कार्यालयाच्या तत्परतेमुळे ५८ वर्षीय व्यक्तीला मिळाले जीवदान

0 4 6 4 4 2
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.7

जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ असलेल्या मुख्य टपाल कार्यालयात दी. 07 जुले मंगलवार रोजी मानवतेचा आणि कर्तव्यदक्षतेचा प्रेरणादायी अनुभव पाहायला मिळाला. आवर्ती ठेव (आरडी) खात्यात रक्कम जमा करण्यासाठी आलेल्या सुमारे ५८ वर्षीय व्यक्तीची अचानक प्रकृती बिघडली आणि ते कार्यालयाच्या आवारातच बेशुद्ध होऊन कोसळले.

घटनेनंतर त्यांच्या एका नातेवाईकाने रुग्णवाहिका अथवा ऑटो रिक्षाची व्यवस्था करण्यासाठी धाव घेतली. मात्र परिस्थितीची गंभीरता ओळखून जालना मुख्य टपाल कार्यालयातील मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) श्री. निलेश शिळारकर यांनी क्षणाचाही विलंब न करता धाडसी निर्णय घेतला.

बेशुद्धावस्थेतील व्यक्तीची हृदयक्रिया सुरू राहावी यासाठी त्यांनी सतत छातीवर दाब (CPR) देत त्यांना तातडीने जालना क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये पोहोचविले. वेळेत मिळालेल्या या प्राथमिक उपचारांमुळे आणि तत्पर वैद्यकीय सेवेमुळे संबंधित व्यक्तीचा जीव वाचला असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रसंगी श्री. निलेश शिळारकर यांनी दाखविलेली प्रसंगावधानता, धैर्य आणि सामाजिक बांधिलकी यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. योग्य वेळी घेतलेला निर्णय आणि सीपीआरसारख्या जीवनरक्षक प्राथमिक उपचारांचे महत्त्व या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

जालना मुख्य टपाल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दाखविलेली ही मानवतेची भावना आणि सेवाभाव नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, “कर्तव्यापलीकडे जाऊन माणुसकी जपणारे पोस्ट कर्मचारी” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. मुख्य पोस्ट मास्टर गणेश परिपेल्लि यानी निलेश शिळारकर यांचे अभिनंदन केले l

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 4 4 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे