pub-7425537887339079
ब्रेकिंग

उरण-मोरा रोडवर भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन तरुणांचा मृत्यू, अपघातस्थळी गतिरोधक बसवण्याची मागणी

0 4 3 8 6 9
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि

 

उरण ते मोरा रोडवरील हरिश्चंद्र गावंड उद्यानासमोर रविवारी पहाटे 3 वाजता दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून त्यांना सकाळी 3:40 व 3:45 वाजता मृत घोषित करण्यात आले. उरण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या माहितीनुसार, हा अपघात 1 जून 2026 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडला. मोरा कडून सीबी शाईन मोटारसायकल क्र. MH-46-BU-0421 वरून महेश प्रल्हाद चांदेकर (वय 35, रा. बोरी मागिरदेव परिसर, डोंगरआळी, उरण) हा उरणकडे येत होता. त्याच वेळी उरणकडून मोरा दिशेने बुलेट मोटारसायकल क्र. MH-03-DP-1948 वरून निखील दिपक कुकडे (वय 38, रा. शिवसागर अपार्टमेंट, नागाव पोलीस लाईनसमोर, नागाव रोड, उरण) हा जात होता. हरिश्चंद्र गावंड उद्यानासमोर दोघांनीही आपापल्या ताब्यातील वाहने बेदरकारपणे चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत एकमेकांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. अपघाताची माहिती मिळताच उरण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी वैभव यशवंत कडू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. 166/2026 नुसार बीएनएस कलम 106(1), 125(ब), 281 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 व भा.दं.वि. कलम 304 अ, 338, 279 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातस्थळी भेट देणारे अधिकारी सपोनि स्वप्नील केदार यांनी पंचनामा केला असून प्राथमिक तपासही तेच करत आहेत. 1 जून 2026 रोजी सकाळी 7:37 वाजता गुन्हा तात्काळ दाखल करण्यात आला. दरम्यान, या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. उरण-मोरा हा मार्ग संपूर्ण हायवेसारखा असून या रस्त्यावर एकही गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने धावतात. अपघात झालेल्या ठिकाणी जर गतिरोधक असता तर वाहनांचा वेग कमी होऊन दोघांचे प्राण वाचण्याची शक्यता होती, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावेत, अशी जोरदार मागणी आता जनतेकडून होत आहे. या अपघातामुळे उरण परिसरात हळहळ व्यक्त होत असून पहाटेच्या सुमारास भरधाव वेगाने वाहने चालवणे जीवावर बेतू शकते, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. उरण पोलीस अधिक तपास करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे