तालुकास्तरीय 400 मीटर धावणे या शर्यतीत तालुक्यातून द्वितीय क्रमांक मिळवून जिल्हास्तरासाठी जिजाऊ विद्यालयाचा ऋषिकेश संतोष तुपकर याची निवड

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.11
नुकत्याच पार पाडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये जिजाऊ कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी ऋषिकेश संतोष तुपकर यांने 400 मीटर धावणे या शर्यतीत द्वितीय क्रमांक मिळवून जिल्हास्तरासाठी पात्र झालेला आहे. याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा डॉ सौ सुरेखाताई संजयजी लहाने व जिजाऊ ग्रामीण विकास व मित्र मंडळ जाफराबाद भोकरदन चे सन्माननीय अध्यक्ष श्री संजयजी लहाने सर यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री पी बी लहाने सर मुख्याध्यापक श्री एस आर फलटणकर सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जीआर वायाळ, के आर घुणावत ,व्ही एस उबरहांडे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



