विविध व्यासपीठावर आपल्या समलोचन आणि निवेदनातून समाज प्रबोधन करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या शिवसंकल्प समालोचक असोसिएशन च्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येस कोप्रोली आदिवासी शाळेतील विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश वाटप आणि खाऊवाटप व स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.
आपल्या समालोचन निवेदनाच्या मिळणाऱ्या मानधनातून काही रक्कम स्वइच्छेने असोसिएशन कडे जमा करून १० वी नंतर गरिबीमुले शिक्षण घेण्यास असमर्थ असणाऱ्या व ११ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक अर्थसहाय्य, गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत, शाळांना संगणक, प्रिंटर अशी शैक्षणिक उपकरणे, अपंगांना व्हील चेअर, सायकल, शाळांना ब्लूटूथ स्पीकर, आदिवासी वस्तीवर स्नेहभोजन,दिवाळी फराळ वाटप तसेच वस्त्रदान असे सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या शिवसंकल्प समालोचक असोसिएशन च्या वतीने स्टेप आर्ट डान्स अकॅडमी च्या मार्गदर्शिका सुनंदा कुमार मॅडम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, शाळेचे मुख्याध्यापक कल्पेश ठाकूर यांच्या तर्फे शालेय गणवेश वाटप आणि मोरा उरण येथिल साईंचे निस्सीम भक्त आकाश कोळी यांची सुकन्या कु. सबुरी हिच्या वाढदिवसाप्रित्यर्थ स्नेहभोजन असे विविध उपक्रम असोसिएशन च्या तर्फे आयोजित केले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे मुख्याध्यापक कल्पेश ठाकूर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर असोसिएशन चे सल्लागार आणि सुप्रसिद्ध निवेदक रायगड भूषण नितेश पंडित यांनी कार्यक्रमाचे निवेदन आणि संकल्पना मांडली.कार्यक्रमा प्रसंगी असोसिएशन चे अध्यक्ष राजेंद्र भगत, माजी खजिनदार जीवन डाकी, माजी कार्याध्यक्ष पप्पू सूर्यराव, सदस्य स्वप्निल पाटील, राहुल प्रधान, केंद्रप्रमुख निलेश भेरे, मुख्याध्यापक कल्पेश ठाकूर तसेच उत्सव मूर्ती सुनंदा कुमार मॅडम, कु. सबुरी कोळी, आकाश कोळी, मंदाकिनी कोळी, स्टेप आर्ट चे रोहन भोईर आणि सरिता शुक्ला, मोनिका चौकर आणि शाळेतील विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
शेवटी कुमार मॅडम यांनी कार्यक्रम आयोजित करणाऱ्या शिवसंकल्प असोसिएशन आणि स्टेप आर्ट च्या सर्व सभासदांचे, शाळेचे आणि उपस्थितांचे आभार मानले.