महालक्ष्मी पूजन व गौरी आवाहन उत्साह देणारा सण —- हरिभक्त परायण विठ्ठल महाराज

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.18
महालक्ष्मी उत्सव गौरी आवाहन आणि पूजन हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे जो भाद्रपद महिन्यात गणेश उत्सवाच्या दरम्यान साजरा केला जातो या उत्सवात श्री गणेशाच्या सोबतीला म्हणजे गौरी महालक्ष्मी यांचे आवाहन होते सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती करून घराघरांमध्ये भक्तिभावाने साजरा केला जातो. सध्या टेंभुर्णी जाफराबाद परिसरात जेष्ठा कनिष्ठा गौरी प्रत्येक घरी जेष्ठा कनिष्ठा गौरीची आगमन झालेली आहे महालक्ष्मी उत्सव हा केवळ संपत्तीची पूजा नसून घरातील सुख समाधान सुचिता आणि तृप्ती याचे प्रतिक आहे हा संत श्री शक्तीचा गौरव करतो यादरम्यान घरोघरी हळदी कुंकाचे कार्यक्रम आयोजित केले जातात यामुळे सामाजिक सालोखा आणि कौटुंबिक नातेसंबंध अधिक दृढ होतात. अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा कनिष्ठा गौरीची आवाहन होते ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मी पूजन नैवेद्य होतो आणि मूळ नक्षत्रावर महालक्ष्मी माता विसर्जन सांगत होते पहिल्या दिवशी चे महत्व पहिला दिवस गौरी आवाहन या दिवशी महालक्ष्मीची महागौरीचे वाजत गाजत स्वागत केले जाते या दिवशी घराभोवती सुंदर रांगोळी काढून देवीला वाजत गाजत घरात आणले जाते तिला घरातील समृद्धीचे ठिकाणे तिजोरी स्वयंपाक गृह इत्यादी दाखवले जाते घराच्या अंगणामध्ये महालक्ष्मीचे ठसे उमटवले जातात रांगोळी ने संध्याकाळी देवीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे दुसरा दिवस मुख्य पूजा आणि महाप्रसाद हा पूजेचा मुख्य दिवस असतो या दिवशी देवीची पूजा अर्चना केली जाते तिला विविध सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी नऊवारी साडी लेकी प्रमाणे नटविले जाते जाते संध्याकाळी महाआरती करून देवीला नैवेद्य सोळा भाज्या किंवा 21 भाज्याचा खीर केळीच्या पानावर पुरणपोळीचा पंचपक्वान्याचा विस्तीर्ण नैवेद्य महाप्रसाद सोळा दिवेअर्पण केला जातात या दिवशी सुवासिनी एकत्र येऊन पारंपारिक गाणी गातात खेळ खेळतात आणि घागरी फुंकतात तिसऱ्या दिवशी चे महत्व तिसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून तिचे विसर्जन केल्या जाते देवीला निरोप देताना सुवासिनीच्या डोळ्यात पाणी असते लोकपरंपरेनुसार विसर्जनाच्या ठिकाणची वाळू किंवा माती पुन्हा घरात आणून समृद्धीसाठी पसरवली जाते जेणेकरून मांगल्य सदैव घराती टिकत राहीले महालक्ष्मीला निरोप देताना सुवासिनी हळदी होऊ सुके खोबरे देण्याची प्रथा आहे पौराणिक कथेनुसार कोलासुर नावाच्या राक्षसांनी महाउत्पात माजवला होता तो चांगल्या सात्विक लोकांचे हनन करून स्त्रियांना त्रास देत असे देवीन पृथ्वीवरील संकट दूर करण्यासाठी राक्षसाचा वध करण्यासाठी देवीने महालक्ष्मीचे रूप धारण केले वाईट शक्तीवर चांगुलपणाचा विजयाचे प्रतिक नारीशक्ती मध्ये नवचैतन्य येणारा हा सन टेंभुर्णी शहरामध्ये प्रत्येक घरी हा सण मोठ्या धूम धडाक्यात भक्तीमय वातावरणामध्ये संपन्न होत आहे सर्वांना महालक्ष्मी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा यावर्षी सर्वत्र पाऊस पडू दे बळीराजा सुखी राहू दे ही महालक्ष्मी चरणी प्रार्थना.
्



