pub-7425537887339079
ब्रेकिंग

अमरधाम स्मशान भूमीचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करणार – मा.आ.गोरंटयाल

0 4 1 2 0 0
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनीधी,दि.10
शहरातील अमरधाम स्मशान भूमीमध्ये आवश्यक त्या सोई सुविधा व सुशोभीकरण करण्यासाठी आपले सदैव सहकार्य राहील अशी ग्वाही जालन्याचे माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंटयाल यांनी दिली.
   अमरधाम स्मशान भूमीत रुख्मिणी परिवाराच्या वतीने विविध विकास कामांच्या उभारलेल्या कोनशिलेचे अनावरण काल गुरुवारी माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका सौ.संगीताताई गोरंटयाल, युवा नेते नगरसेवक अक्षय गोरंटयाल, उद्योजक कैलास लोया, रमेश मगरे, सुरेश मगरे, सुभाषराव वाघमारे, किशोर खंडाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलतांना गोरंटयाल म्हणाले की, रामतीर्थ स्मशान भूमीच्या धर्तीवर अमरधाम स्मशान भूमीचा देखील कायापालट करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वांची मदत घेऊन निश्चितपणे प्रयत्न केला जाईल असे स्पष्ट करून अमरधाम स्मशान भूमीत डेबूजी परिट समाज व गुरू शिष्य परिवाराच्या सदस्यांनी किशोर खंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगे बाबा उद्यान विकसित करत राबवत असलेल्या स्वच्छ्ता मोहिमेचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी आपल्या भाषणातून कौतुक केले. तत्पूर्वी उद्योजक कैलास लोया यांनी स्मशान भूमीत सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल अशी ग्वाही दिली.प्रारंभी रुख्मिणी परिवाराचे पदाधिकारी सेवानिवृत्त अभियंता सुनील जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रमा मागील भूमिका विशद केली. यावेळी माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्या वाढदिवसा निमित्त उद्योजक कैलास लोया व गुरू शिष्य परिवाराचे प्रमुख किशोर खंडाळे यांनी त्यांचे शाल,पुष्पगुच्छ व शालेय साहित्य देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास रुख्मिणी परिवाराचे गजानन जांगिड, किशोर देशपांडे, रवि गव्हाणकर, संजय देशपांडे, संदीप मुंदडा, संजय चौधरी, दिलीप देशपांडे, शाम कुलकर्णी डेबूजी परिट समाज व गुरू शिष्य परिवाराचे गणेश मेव्हणकर, रोषन इंगळे,बळीराम मोरे, संतोष रेगुडे, आतिश वाघ, विवेक पाटील, सचिन शेलार, विनायक इंगळे यांच्यासह रुख्मिणी परिवार, डेबूजी परिट समाज आणि गुरू शिष्य परिवाराचे पदाधिकारी, सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 2 0 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे