pub-7425537887339079
ब्रेकिंग

महेंद्रशेठ घरत दाम्पत्यातर्फे गव्हाणच्या शांतादेवीला सोन्याचा हार अर्पण!

महेंद्रशेठ यांनी 'समायरा'सोबत घेतले शांतादेवीचे दर्शन!

0 4 1 1 9 8
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.11
पंचक्रोशित सुप्रसिद्ध असणाऱ्या गव्हाणच्या शांतादेवीची यात्रा शनिवारपासून (ता. ११) सुरू झाली. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेला शेकडो वर्षांची धार्मिक व ऐतिहासिक परंपरा आहे. आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत हे शांतादेवीचे निस्सीम भक्त आहेत. दर मंगळवारी ते न चुकता शांतादेवीचे दर्शन घेतात. त्यानंतरच दिवसभरातील कामांना सुरुवात करतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते हे नित्यनेमाने करतात. गेली चार-पाच वर्षे महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत या दाम्पत्यातर्फे शांतादेवीला यात्रेच्या दिवशी सोन्याचा हार अर्पण केला जातो. शांतादेवी नवसाला पावते, ही भाविकांची भावना आहे. परिसरातील नागरिकांची शांतादेवीवर अपार श्रद्धा आहे.
यंदा तर महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई आजोबा झालेत. त्यांच्या घरात समायरा हिच्या रूपाने नात जन्माला आलेली आहे. त्यामुळे यंदा शांतादेवीची यात्रा आणि नात समायरा हिच्या जन्माचा दुग्धशर्करा योग असल्याने घरत दाम्पत्य अत्यानंदात आहेत. त्यामुळे शनिवारी (ता.११) सकाळी महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत, नात- समायरा, सोनाली घरत-चौधरी, मयूरेश चौधरी यांनी सहपरिवार सकाळीच शांतादेवीची ओटी भरून पूजा केली, मनोभावे दर्शन घेतले आणि सोन्याचा हार अर्पण केला. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “मी शांतादेवीचा निस्सीम भक्त आहे. आई-वडील, गणपती बाप्पा, शांतादेवी यांचे  अपार ऋण माझ्यावर आहेत. त्या ऋणातून  मुक्त होऊ शकत नाही, पण प्रयत्न करू शकतो. पूर्वी शांतादेवीला सावकार दागिने द्यायचे, हे लहानपणी मी पाहायचो. तेव्हा मला कुतूहल वाटायचे. आज मला आई-वडील, गणपती बाप्पा, शांतादेवी यांच्यामुळे सोन्याचे दिवस आलेत. त्यामुळेच मी ह्रदयाच्या अंतःकरणापासून शांतादेवी सोन्याचा हार अर्पण केला आहे.”
यावेळी एम. जी. ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 1 9 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे