pub-7425537887339079
ब्रेकिंग

जालन्यातील मुलींना कमर्शियल पायलट होण्याची संधी

0 4 9 6 5 7
[sp_wpcarousel id="1375"]

जालना, दि.22 (जिमाका) : जालना जिल्ह्यातील होतकरू मुलींना विमान वाहतूक क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या पुढाकारातून ‘IndiGoReach’च्या ‘Giving Wings to Fly – Shaping the Future of Indian Women in Aviation’ या उपक्रमांतर्गत विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम 24 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 6वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील DPC Hall येथे होणार आहे. या कार्यक्रमातून पात्र युवतींना कमर्शियल पायलट म्हणून करिअर करण्याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षणाच्या संधीची माहिती दिली जाणार आहे.

या योजनेसाठी 18 ते 38 वयोगटातील भारतीय महिला उमेदवार पात्र आहेत. बारावीमध्ये इंग्रजी, भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांत प्रत्येकी किमान 51 टक्के गुण असणे आवश्यक आहे. तसेच लागू असलेले EWS उत्पन्न निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

निवड झालेल्या पात्र उमेदवारांना Commercial Pilot Licence (CPL) आणि ATR Type Rating Training देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाच्या कालावधीत निवास व भोजनासाठी १०० टक्के सहाय्य, वैद्यकीय विमा, पायलट मेंटॉरशिप आणि करिअर मार्गदर्शनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातील मुलींना पारंपरिक करिअरच्या पलीकडे जाऊन विमान वाहतूक क्षेत्रात संधी मिळावी आणि त्यांचा या क्षेत्रातील सहभाग वाढावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आर्थिक किंवा सामाजिक परिस्थितीमुळे मुलींच्या स्वप्नांना मर्यादा येऊ नयेत, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

“जालन्यातील मुलींनी विमानात केवळ प्रवासी म्हणून नव्हे, तर कॉकपिटमध्ये पायलट म्हणूनही बसावे. त्यांनी आत्मविश्वासाने आकाशाला गवसणी घालावी,” अशी भावना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी व्यक्त केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 6 5 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे