जालना शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने वृक्ष वाटप व भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

जालना/प्रतिनिधी, दि.22
जालना : जालना शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने सन्माननीय महिला नगरसेविका व मनपाशी संलग्न महिला बचत गटांसाठी वृक्ष वाटप उपक्रमाचा शुभारंभ तसेच भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. 24/06/2026 रोजी सकाळी 11 वाजता जालना शहर महानगरपालिका येथे आयोजित करण्यात येणार आहे. महापौर श्रीमती वंदनाताई मगर, उपमहापौर श्री राजेश राऊत व आयुक्त श्रीमती अंजली शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, महिलांचे आरोग्य व जनजागृती यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. कृष्णा कोरेडे संचलित कलावती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गट व स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी भव्य आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमास महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. संध्या संजय देठे, उपसभापती सौ. पद्मा अजित मानधने तसेच समितीचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित राहणार आहेत. महिला सक्षमीकरण, आरोग्य जागरूकता आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.



