राजवर्धन कळंबे, अश्विनी भागवत या दोघांच्या वडिलांचे निधन,
दुःखाचा डोंगर ग्रामीण भागातील विद्यार्थी यांचे नीट मध्ये यश. दुःखाच्या संघर्षातून समाधाना कडे

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.19
नीट पेपर फुटल्या नंतर पालक वर्गात आणि विद्यार्थी यांच्या कडून मोठा संताप व्यक्त केला गेला. पेपर चांगला गेला आणि पेपर फुटल्या मुळे सगळे रद्द झाल्यानंतर पुन्हा पेपर देऊन चांगले मार्क घेणे खूप अडचणीचे आणि खूप वेदनादायी झाले होते. मात्र टेंभुर्णी येथील दोन वेवगळ्या विद्यार्थी यांची आपल्या वडिलांच्या निधनानंतर खचून न जाता त्यांच्या स्वप्नाची पूर्ती साठी दुःख सोबत घेऊन मिळविलेले यश हे मोठे असल्याचे दाखवून दिले. टेंभुर्णी येथील सामाजिक कार्यकर्ता शिक्षक पत्रकार ते सामाजिक आणि राजकीय कामात नेहमी अग्रेसर असलेल्या स्व.विनोद कळंबे यांचे 22 मार्च रोजी अपघाती निधन झाल्यानंतर दुःखातून स्व विनोद कळंबे यांच्या मुलागा राजवर्धन कळंबे यांनी नीट सारख्या अवघड परीक्षा मध्ये 456 मार्क घेत चांगले यश प्राप्त केले.वडिलांच्या निधना नंतर परीक्षेला सामोरे जाऊन यश प्राप्त करून वेगळा आदर्श ठेवला आपल्या वडिलाचे निधन झाल्याने नीट सारख्या परीक्षेत मिळालेले यश खूप मोठे असून त्यांच्या यशा बद्दल त्यांचे कौतुक होत आहे. टेंभुर्णी येथील सर्व सामान्य शेतकरी परिवार मधील अश्विनी सांडू भागवत या मुलांनी 480 मार्क घेत मोठे यश प्राप्त केले. विशेष म्हणजे आपल्या वडिलाचे निधन ज्या दिवशी पेपर होता दिनांक 21 जून रोजी पेपर असल्याने सकाळी वडील यांचे निधन त्याच दिवशी दुपारून पेपर आणि रात्री अंत्य विधी ही गोष्ट मनाला हलवून ठेवणारी होती. या सगळ्या परिस्थितीतून विद्यार्थी जर 480 मार्क घेतात ही खुप मोठी गोष्ट आहे. विशेष म्हणजे तुला वडील वारले हे सांगितले नव्हते पेपर झाल्यावर ही गोष्ट तिला माहीत झाल्यावर तिच्यावर दुःखाचा जणू डोंगर कोसळला होता. तिने संपादन केलेले यश हे खूप मोठे असून शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी अशी प्रगती करतात ही खूप मोठी गोष्ट बाब असून तिच्या वर आलेल्या दुःख सावरून नीट मध्ये प्राप्त केलेल्या यशा बद्दल सर्वत्र या दोन्ही विदार्थी आणि परिवारचे अभिनंदन होत आहे.


