pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णी ला नगरपंचायत का नाही, कुठे थांबली आदेशासाठी ची फाईल, गावातील नेतेमंडळी गप्प का?

0 4 3 8 7 0
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.31

वीस हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या टेंभुर्णी गावाचे नगरपंचायतीत रूपांतर व्हावे, यासाठी ग्रामस्थांनी गेल्या एक वर्षापासून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. मात्र, टेंभुर्णी ग्रामपंचायतीची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपल्यानंतर आता पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, आगामी निवडणूक नगरपंचायतीची होणार की पुन्हा ग्रामपंचायतीचीच, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. शासनाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय आरक्षणाचा कार्यक्रम जून महिन्यात जाहीर केल्याने ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या चळवळीसमोर नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. टेंभुर्णी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर व्हावे, यासाठी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच तालुका प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने दिली आहेत. त्यामुळे लवकरच नगरपंचायतीचा मार्ग मोकळा होईल, अशी आशा ग्रामस्थांना होती. मात्र, जिल्हा परिषद स्तरावर अद्यापही या प्रस्तावाबाबत कोणतीही ठोस हालचाल दिसून येत नसल्याने नगरपंचायतीचे स्वप्न सध्यातरी अधांतरी असल्याचे चित्र आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षात टेंभुर्णी गावाचा झपाट्याने विस्तार झाला आहे. वाढती लोकसंख्या आणि नागरी चौकट:- ग्रामस्थांनी मतभेद विसरून एकत्र येऊन नगरपंचायतीसाठी लढा द्यावा, अन्यथा टेंभुर्णी विकासापासून आणखी दूर जाणार यात शंका नाही. जनार्धन झोरे, सामाजिक कार्यकर्ता, टेंभुर्णी सुविधांची गरज लक्षात घेता ग्रामपंचायत स्तरावर मिळणारा वित्त आयोगाचा निधी अपुरा पडत आहे. परिणामी, पिण्याच्या पाण्याची समस्या, गावांतर्गत रस्ते, नाली बांधकाम यांसारखी अनेक विकासकामे रखडली आहेत. सध्या गावाला १५ ते २० दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यास विकास निधीत वाढ होऊन मूलभूत सुविधांच्या प्रश्नांना गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. नगरपंचायतीची फाइल जिल्हास्तरावरच पडून टेंभुर्णी ग्रामपंचायतचे नगरपंचायतीत रूपांतर व्हावे म्हणून आम्ही थेट मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, विभागीय आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत निवेदने दिली. मात्र, गेल्या एक वर्षात केवळ ग्रामपंचायत स्तरावरून प्रस्ताव गटविकास अधिकारी कार्यालयात आणि तेथून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पाठविण्यापर्यंतच काम झाले. नगरपंचायतीची फाइल अद्याप जिल्हास्तरावरच पडून असल्याचे समजते. यात गावांतर्गत राजकारणही आड येत असल्याची चर्चा आहे. चौकट:- टेंभुर्णी हे जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील सर्वात मोठे गाव, निजाम राजवटी पासून मोठी ग्रामपंचायत आहे, विकासासाठी नेहमी एक गाव आसुसलेले असते, वृद्ध नागरिकाने आमच्या वृत्त प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, तरी वाटते ग्रामपंचायत नगरपंचायत मध्ये रूपांतरित होऊ नये, मुलांच्या नावाखाली नगरपंचायतीला खूप मोठा निधी येत असतो, कोणाला तरी वाटते या निधी येऊ नये, सद्यस्थितीत ग्रामपंचायतला ही भरपूर निधी येत असतो, तोच खर्च करण्यासाठी ग्रामपंचायतला वेळ नाही, विविध समस्या गावामध्ये असताना ग्रामपंचायतीचे नियमित दुर्लक्ष लक्ष होत आहे. बघूया भविष्यात गावकऱ्यांना, गावातीलच नेते मंडळींना, नगरपंचायत हवी का नको. एक वृद्ध इसम

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 7 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे