pub-7425537887339079
ब्रेकिंग

झेडपी शाळा, रस्त्यांची दुरवस्था; लोकप्रतिनिधींवर गावकरी संतप्त निवडणुकांपुरतीच कामे होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

0 4 6 3 4 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.11

जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. शाळेच्या खोल्या पडक्या असून काहींचे पत्रे उडालेले आहेत. दुसरीकडे, शेतवस्तीवरून शाळेकडे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पक्का रस्ता नाही. पावसाळ्यात मुलांना चिखल तुडवत शाळेत जावे लागते. या समस्येमुळे गावकरी संतप्त झाले असून, लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरवल्याचा आरोप होत आहे. जाफ्राबाद तालुक्यातील अनेक गावांमधील जिल्हा परिषद शाळांकडे जाण्यासाठी साठी धड रस्ता नसल्याने विद्याथ्यांची मोठी गैरसोय होत आहे. निवडणुका जवळ आल्यावर प्रशासकीय 66 पाणंद रस्ते मजबूत करा “रस्त्यावर पडलेले खड्डे आणि साचलेले गटार यामुळे शाळकरी मुलांना चिखलातून वाट शोधावी लागते. आमच्या लोकप्रतिनिधींनी वेळ मिळाला तर पाणंद रस्ते आणि रोड मजबुतीकरण करून देण्यासाठी वेळ काढावा.” – गजानन पाटील देठे, पालक कर्मचारी आणि गुत्तेदार रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी येतात, मात्र निवडणूक संपताच त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जाते, अशी खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. पुढची निवडणूक येईपर्यंत रस्ते आणि शाळांकडे कोणीही पाहत नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था पाहून अनेक पालक 66 शाळा बसला रस्ताच नाही “शाळा आहे पण खोल्या नाहीत. कुठे पत्रे उडालेल्या शाळा तर कुठे दांडी मारणारे गुरुजी. त्यामुळे दोन पैसे जास्त जातात पण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना शिक्षण मिळते. परंतु गावाकडे जाण्यासाठी शाळेच्या बसला रस्ता नसल्याने मुलांना फाट्यावर आणून सोडावे लागते.” – विलास पवार, पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेत आहेत. मात्र, गावाच्या वेशीपासूनच रस्ते चिखलमय आणि खड्डेमय असल्याने तेथेही वाहने चालवताना कसरत करावी लागते. अनेक कुटुंबे आता गाव सोडून शेतवस्तीवर वास्तव्यास आहेत. त्यांच्यासाठी पाणंद रस्ता योजना राबविण्यात येत शेतवस्तीवर असली, तरी या रस्त्यांना क्रमांक नसल्याने निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे ही योजना केवळ कागदावरच उरली आहे. पावसामुळे निर्माण होणाऱ्या चिखलातून आणि खड्ड्यांतून दररोज वाट काढावी लागत असल्याने शेतकरी आणि मजुरांची मोठी अडचण होत आहे. शासनाने या शाळा आणि रस्त्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 3 4 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे